विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द
परिक्षेसाठी दिला होता पंधरा दिवसाचा कालावधी
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परिक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावली नुसार ३० दिवसांच्या आधी वेळापत्रक जाहीर करावा लागतो. परंतु तसे न होता विद्यापीठाद्वारे उशीरा वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण व प्रचंड अस्वस्थता होती त्यानुसार विद्यार्थी हक्क कृती समितीचे नागपूर विभाग प्रमुख विश्वभुषन पाटील आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुलगुरू यांची भेट घेत सविस्तर विषय समजून सांगत वेळापत्रक रद्द करण्याची मागणी केली होती. चर्चे अंती विद्यापीठाने ६ मे ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परिपत्रक काढून
विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 परीक्षा दिनांक 15.05.2023 पासून अंतिम वर्ष पदवी व पदविका अभ्यासक्रम व दिनांक 22.05.2023 पासून अंतिम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षांचे वेळापत्रक रद्द केल्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले.
असुन हया परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.