पत्नी आणि प्रियकराने नवऱ्याला या कारणाने धू धू धुतले
नोएडा/ नवप्रहार मीडिया
पत्नी आणि पती यापैकी कोणाचेही विवाहबाह्य सबंध असेल की त्यांच्यात वाद, कटकट ही बाब नित्याचीच. अनेक वेळा अश्या अनैतिक संबंधामुळे हत्या, खून यासारखे प्रकार घडतात. पत्नी आणि तिचा प्रियकर पकडल्या गेले तर पती आणि त्याचे कुटुंबीय त्या प्रियकराची यथेच्छ धुलाई करतात. त्याला पोलिसात देखील देतात. पण नोएडा येथे वेगळाच प्रकार घडला आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराला पतीने आपत्तीजनक स्थितीत पकडल्यावर पतीने पत्नीच्या प्रियकराला जाब विचारला असता त्या दोघांनी मिळून त्याची जबरदस्त धुलाई केली आहे.
ही घटना राजधानी दिल्लीजवळच्या नोएडातली आहे. या ठिकाणी पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून पतीवर जीवघेणा हल्ला केला. मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय, असं समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. आसपासच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर पीडित पतीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सेक्टर 24 हद्दीतील मोरणा गावात राहणारे छोटा बाबू रावत यांनी ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली की ते ड्युटी आटपून घरी आले असता त्यांना चौडा गावात राहणारा टिकेंद्र सिंह चौहान घरी आढळून आला.त्याने टिकेंद्र आपल्या घरी कसा काय आला? असा जाब विचारला असता पत्नी संतापली पोलखोल होण्याच्या धास्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याला लोखंडी रॉड ने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला.
पीडित पती बेशुद्ध पडल्यावर दोघांनीही त्याला मृत समजून तेथून पळ काढला. जवळच्या नागरिकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रावत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पीडित छोटा बाबू रावत यांच्या तक्रारीवरून टिकेंद्र सिंह चौहान आणि दुर्गा रावत यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.