दिपक हरीमकर यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी नवव्यांदा अविरोध निवड
राजेश सोनुने पुसद:तालुका प्रतिनिधी:
पुसद तालुक्यातील माळपठारावरील रोहडा येथील म.गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच दिपक हरीमकर यांची नवव्यांदा अविरोध निवड करण्यात आली.
पुसद तालुक्यातील रोहडा येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते दिपक हरीमकर यांची म.गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून मागील वर्षीचीच तंटामुक्त गाव समिती कायम ठेवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.पञकार दिपक हरीमकर हे उच्च शिक्षित असून गावातील तंटे गावातच मिटविण्यात त्यांचा हातखंडा आहे.मागील अनेक वर्षांपासून ते गावात व परिसरात व्यसनमुक्ती साठी सतत कार्यरत आहेत.रोहडा गावात शांतता ठेवण्यासाठी दिपक हरीमकर यांच्या सोबत गावातील पोलीस पाटील राजकुमार पारीसकर, सरपंच,ग्राम पंचायत सदस्य व तंटामुक्त गाव समिती सतत कार्यरत राहते. रोहडा येथील म. गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दिपक हरीमकर यांची नवव्यांदा अविरोध निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वच स्तरातून दिपक हरीमकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.