विदेश

प्रसिद्धीच्या नादात अशी जोखीम पत्करणे कितपत योग्य ?

Spread the love

 हल्ली सोशल मीडियावर असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात जे प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या आवडीच्या प्राण्यांसोबत ते सतत कुठलेना कुठलेतरी व्हिडीओ शेअर करतात.

                   सोशल मीडिया हा माहिती आणि ज्ञानात भर पडण्याचे साधन असला तरी सध्या सोशल मीडियाचा गैरवापर होतांना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी युजर्स कुठल्याही स्तराला जात आहेत. यामुळे अनेक लोकांनी जीव गमावल्याच्या बातम्या याच सोशल मीडियावर व्हायरल होत असताना देखील लोकं न घाबरता आणि आपला जीव धोक्यात टाकून फक्त प्रसिद्धी साठी नको ती जोखिम पत्करत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊ नेमके काय आहे या व्हिडिओत ?

समोर आलेल्या या व्हिडीओमधील एक व्यक्ती चक्क अॅनाकोंडासारख्या भयानक सापाचे शूट करण्यासाठी पाण्यात उतरतो.

हा व्हायरल व्हिडीओ ब्राझीलमधील पंतनाल वेटलँड या ठिकाणी शूट करण्यात आला असून तो इन्स्टाग्रामवरील @safari.travel.idea या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती सुरुवातीला व्हिडीओमध्ये ॲनाकोंडाला दाखवत आहे. त्यानंतर ती व्यक्ती हळूहळू ॲनाकोंडाचे शरीर दाखवताना दिसतो. यावेळी अनेकदा ती व्यक्ती शूट घेण्यासाठी ॲनाकोंडाच्या खूप जवळही जाते, पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून त्याला तो ॲनाकोंडा काहीही करत नाही.

या व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या पेजवर कॅप्शमध्ये लिहिलंय की, ‘आम्ही ॲनाकोंडाचे असे शूट करण्याची शिफारस करत नाही. खरं तर, आम्ही मनुष्याला खाण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर पाण्यात उतरू नये असा सल्ला देऊ. पण, काही लोकांकडे ते सुरक्षितपणे करण्याचे कौशल्य असते. या व्हिडीओद्वारे सांगायचंय की, पंतनाल हे खूप मोठ्या ॲनाकोंडाचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे. त्यांना उष्णकटिबंधीय पाणथळ वस्ती आवडते आणि पंतनाल ही जगातील सर्वात मोठी उष्णकटिबंधीय आर्द्रभूमी आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना सापांची आवड आहे, तसेच ज्यांना जंगलात ॲनाकोंडा पाहायला आवडेल, त्यांना आम्ही पंतनालला भेट देण्याची शिफारस करतो.’

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओला आत्तापर्यंत ४.८ मिलियन व्ह्यूज मिळाले असून एक लाखांहून अनेकांनी याला लाइक केले आहे. तसेच यावर अनेक जण कमेंट्सही करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close