हटके

लाहानग्याची समयसूचकता पाहून आपणही म्हणाल ‘ व्वा क्या बात है ! ‘ 

Spread the love

 मालेगाव / प्रतिनिधी 

                     काही वेळा अचानक असे प्रसंग घडतात की त्या वेळेस आपण कोणा कडे ना काही मदत मागू शकत ना तेथून निसटता येते. त्यावेळेस आपल्या कडे असलेले बुद्धी कौशल्य आणि समय सुचकताच आपणाला वाचवू शकते.मालेगाव शहरात देखील असाच प्रसंग घडला. पाहू या नेमकी घटना काय आहे ते ?

नामपूर रोड येथील पार्टी लॉन येथे एका कार्यालयात मोहित अहिरे हा मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी त्या कार्यालयाचं दार हे उघडं होतं. तेव्हा अचानक बिबट्या घुसला. जेव्हा बिबट्या आत घुसला तेव्हा त्याचं बिबट्याकडे लक्ष गेलं नाही.. पण जेव्हा बिबट्या थोडासा आत गेला त्यावेळी मोहितने त्याला पाहिलं.

सुदैवाने सोफावर बसलेल्या मोहितकडे बिबट्याचं लक्ष गेलं नाही.. अन तो सरळ पुढे जात राहिला. याचवेळी मोहितने जसा बिबट्या पुढे सरकला तसा सोफावरून खाली उतरत कार्यालयाच्या बाहेर धूम ठोकली. पण याचवेळी त्याने शिताफीने कार्यालयाचा दरवाजा देखील ओढून घेतला. जेणेकरून बिबट्याने पुन्हा माघारी फिरून त्याच्यावर हल्ला करू नये.

दरम्यान, मोहित कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तात्काळ आपल्या घराकडे गेले आणि घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा त्याच्या वडिलांनी देखील कार्यालयाजवळ जाऊन कार्यालयाचं शटर बाहेरून बंद केलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केलं. दरम्यान, हा सगळा प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मालेगाव शहरातील जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन येथे ही घटना घडली. यावेळी गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर कार्यालयातून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्याला ब्लो पाइप मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करुन वनविभागाचे कर्मचारी तेथून घेऊन गेले. ज्यानंतर येथील सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close