हटके

पहिल्या पत्नीची इन्स्टाग्राम वरील रील पाहणे पतीला पडले महाग

Spread the love

रागावलेल्या दुसऱ्या पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट 

अमरावती/ नवप्रहार मीडिया नेटवर्क 

           पहिल्या पत्नीची इन्स्टाग्राम वरील रील पाहणे पतीला चांगलेच महाग पडले आहे. या गोष्टी ने नाराज दुसऱ्या पत्नीने त्याला जाब विचारला असता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि तिने थेट त्याचे गुप्तांग ब्लेडने कापले. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पण त्याठिकाणी त्याची प्रकृती आणखी खलावल्याने त्याला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 आंध्रप्रदेशातील एनटीआयर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका पतीला त्याच्या पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्रामवरील रील्स पाहणे चांगलेच महागात पडले आहे,. ही बाब त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या लक्षात आल्यावर तिला राग अनावर झाला.या रंगाच्या भरात तिने आपल्या पतीचे गुप्तांग ब्लेडच्या साह्याने कापले.

मिळलेल्या माहितीनुसार एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामाचं येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जखमी पतीचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्याने तिच्याशी फारकत घेत विभक्त झाला होता. दरम्यान, त्याने पाच महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते. तो दुसऱ्या पत्नीसोबत मुप्पल्ला परिसरात राहत होता. दरम्यान, तो गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर त्याच्या पहिल्या पत्नीचे रिल्स पाहत होता. ही बाब त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या लक्षात आली. पतीच्या या कृत्यामुळे त्याची दुसरी पत्नी खूप नाराज झाली होती.

 

 

दरम्यान, तिने पतीचा बदला घेण्याचे ठरवले. तिने पतीला याचा जाब विचारला. यातून दोघात कडाक्याचे भांडण झाले. पतीने त्याच्या दुसऱ्या बायकोला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने रागाच्या भरात ब्लेडच्या साह्याने नवऱ्याचे गुप्तांग छाटले. दरम्यान, पतीची प्रकृती बिघडल्याने त्याला तिने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची गंभीर प्रकृती पाहून पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात भरती करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close