गेमिंग ऍप द्वारे धर्मांतरणाचे आणखी एक प्रकरण उघड
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क
काही दिवसनापूर्वी गेमिंग ऍप द्वारे धर्मांतरणच्या घटना घडल्या होत्या.त्यामुळे अश्या ऍप वर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना कडून केक्या जात आहे. अश्यातच राजकोट मधील एक हिंदू युवक या गेमिंग ऍप ला बळी पडल्याचा आणि त्याचे इन्स्टाग्राम च्या माध्यमातून धर्मांतरं झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे.
आशिष गोस्वामी नावाच्या या तरुणाने इंस्टाग्रामवर भेटलेल्या बांगलादेशी मुस्लिम मुलीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र आता हिंदू संघटनांच्या आणि सांधू- संताच्या समजूतीनंतर तो मायदेशी परतला आहे.
हे प्रकरण राजकोट जिल्ह्यातील जेतपूरचे आहे. येथील आशिष गोस्वामी बांगलादेशातील एका कट्टरपंथी तरुणीशी इन्स्टाग्रामवर बोलत असे. त्यानंतर आशिष त्या तरुणीच्या प्रभावामुळे फरारी इस्लामिक कट्टरतावादी झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहू लागला. त्यानंतर पीडित तरुणाने कट्टरपंथी तरुणीशी लग्न करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला. पीडित तरुणाचे धर्मांतर केल्यानंतर त्यांचे नाव शेख मोहम्मद अलसामी ठेवण्यात आले. धर्मांतरानंतर पीडित तरुणाने घर सोडले. आणि तो मशिदीत राहू लागला. तसेच पाच वेळा नमाज अदा करू लागला.
दि. ५ जुलै रोजी दोन मुस्लीम तरुणांनी आशिषची सुंता करण्यासाठी रुग्णालयात नेले. त्याच्या नातेवाइकांना हा प्रकार कळताच त्यांनीही हॉस्पिटल गाठले. माहिती मिळताच हिंदू संघटनेच्या लोकांनीही घटनास्थळी जाऊन तरुणाची समजूत काढली. पण तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. मात्र, नंतर त्यांना सनातन धर्मात परत आणण्यात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश आले.
स्थानिक हिंदू धर्म सेनेचे नेते आणि जेतपूरच्या नरसिंह मंदिराचे महंत कन्हैयानंद महाराज दि. ५ जुलै रोजी रात्री आशिषच्या घरी पोहोचले. त्याच्यासोबत इतरही लोक होते. जवळपास २ तास सर्वांनी त्याला समजावून सांगितले. यानंतर आशिषचा कट्टरपंथीयांनी ब्रेनवॉश केल्यांचे लक्षात आले. यानंतर महंतांनी त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळक लावून आशिषची सनातन हिंदू धर्मात घरवापसी करून घेतली.
दरम्यान आशिषने महंतांसमोर ट्रिमर घेतला आणि कट्टरपंथींसारखी ठेवलेली दाढी कापून टाकली. आशिष घरी परतल्यानंतर त्याच्या घराबाहेर हिंदू तरुणांचा जमाव आणखी वाढला. सर्वांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा देत हनुमान चालिसाचे पठण केले.