खात येथील लोकल ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरु.
लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केली होती मागणी,
मौदा प्रतिनिधि
तालुक्यातील खात रेल्वे स्टेशन वरील लोकल ट्रेन ही बंद असल्यामुळे सामान्य जनतेला नागपुर- गोंदिया येथे जाण्यासाठी मोठी अड़चन होत असल्यामुळे याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला सुद्धा सोसावा लागला ही लोकल ट्रेन पूर्ववत सुरु व्हावी म्हणून भाजपा नेते मुकेश अग्रवाल . कैलाश वैद्य. शंकर वैद्य. रविंद्र मांडारकर. अरविंद खेवले. कोठीराम वाघाड़े यानी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी व रेल्वे प्रशासनला निवेदनात केली होती.
खात रेल्वे टेशन अंतर्गत कमीत कमी 15 ते 20 गावांचा संपर्क येत असतो. या स्थानका वरूण नागरिक नागपुर. भंडारा. गोंदिया व् त्यापुढेही नागरिक ये जा करतात. तर जिल्ह्याच्या ठिकाणी बाजार पेठ भरत असल्याने किव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदी करण्याकरिता ये जा करावी लागते. तर शिक्षक. मंजूर. व्यापारी. कामगारांना जाण्यायेण्यासाठी याच लोकल ट्रेनचा आधार घेत होते तर हीच ट्रेन गरीबांना आधार देणारी ठरत होती. ट्रेन बंद असल्याचे पाहुन येथील भाजपा नेते मुकेश अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व रेल्वे प्रशासनाला दिले होते. याच विनंतीला मान्य करीत अखेर लोकल ट्रेन सुरु करण्याकरिता दिलासा मिळाला. केंद्रीय नितिन गडकरी व रेल्वे प्रशासनाचे भाजपा मुकेश अग्रवाल . कैलाश वैद्य. शंकर वैद्य. रविंद्र मांडारकर. अरविंद खेवले. कोठीराम वाघाड़े यानी कौतुक केले.