वैनगंगा क्षेत्राची संस्कृति आणि सभ्यता पुस्तकाचे लोकार्पण मंगळवारला
भंडारा – भारताचे तत्कालीन राष्ट्रपति भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठची सर्वोच्च पदवी डि.लीट प्राप्त डाॅ.प्रभाकर गद्रे, पत्रकार व समाजशास्त्र विभाग प्रमुख,एन.एम.डी महाविद्यालय गोंदिया चे डॉ.बबन मेश्राम, इतिहासकार व लेखक अश्वविर गजभिए लिखित वैनगंगा क्षेत्र की संस्कृति और सभ्यता (हिन्दी भाषिक) पुस्तकचा लोकार्पण सोहळा ११ एप्रिल रोज मंगळवार ला भंडारा येथे होणार आहे.
समता व प्रकाश पर्वाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिति भंडारा च्या वतिने दसरा मैदान येथे ११एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध इतिहासकार व विचारवंत प्रो.डाॅ.रतन लाल,दिल्ली विद्यापिठ यांचे हस्ते वैनगंगा क्षेत्राची संस्कृति आणि सभ्यता पुस्तकाचे लोकार्पण होणार असून प्रमुख उपस्थित सड़क अर्जूनी विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे,तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे, प्रसिद्धि नेत्रतज्ञ डॉ.विनोद घडसिंग, विभागीय वन अधिकारी राहुल गवई, डॉ.रविन्द्र वानखेडे, डॉ.अमित मेश्राम,बाबुराव बागडे,विक्की रावलानी, गजानन बादशहा,मनिष वासनिक,विवेक पडोले,अमृत बन्सोड आदि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सदर पुस्तक साहित्य क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण करणार आहे. भारतातील ख्यातिप्राप्त व प्रतिष्ठित प्रकाशन लोट्स अॕन्ड कोब्रा पब्लिशिंग हाउस नागपुर यांनी समता पर्वा निमित्त दिलेली इतिहासकार, संशोधक,अभ्यासक व विशेष म्हणजे गोंदिया -भंडारा जिल्हातिल वैनगंगा तिरावरील निवासी तसेच वाचकांना एक अप्रतिम भेंट ठरणार आहे.
पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रला वैनगंगा तिरावरील माहिती आपण कल्पना करु शकत अशा पध्दतीने रेखाटली आहे.ज्यात वैनगंगा चा प्राचिन इतिहास, आदिवासी जिवन,युग, वैदिक लोक, सातवाहन राजा व धर्म,सांमन्तवाद अशा विविध विषयावर सखोल अध्यन करुन नकाशा आणि चित्र पटलदृश्यतून मांडणी केली आहे.
सदर अविस्मरणीय प्रसंगी बहुसंख्यने नागरीकांनी उपस्थित राहून साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी, सचिव निलीमा रामटेके, कार्याध्यक्ष मंजुषा चव्हाण, कोषाध्यक्ष सचिन बागडे सह पदाधिकारी यांनी केले आहे.