कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर ची निवडणूक काँग्रेस पार्टी तर्फे स्वबरावर लढण्याचा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निर्धार

लाखांदूर तालुका प्रतिनिधी / नरेश गजभिये
दिनांक 25 मार्च 2023 ला नाना पटोले जनसंपर्क कार्यालय येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी लाखांदूर तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 ची स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली सदर सभेचे अध्यक्ष माननीय भूमेश्वर महावाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर सभेमध्ये लाखांदूर तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उत्तम जी भागटकर हे होते तर प्रमुख अतिथी ब्राह्मणकर जी तसेच राऊत व काँग्रेस पार्टीचे लाखांदूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर सभेमध्ये ज्यांना बाजार समितीची निवडणूक लढायची आहे त्यांनी दिनांक 30 मार्च 2023 दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयात फार्म भरून उमेदवारी मागणी नोंद अर्ज करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे सदर सभेमध्ये काँग्रेस पक्ष समर्पित सहकार सुधार आघाडी म्हणून निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज नोंद करायची आहे सदर कार्यक्रमाला लाखांदूर तालुक्यातील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी मोहरणा येथील सरपंच बोरकर यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला व सभा समाप्त झाली असे जाहीर करण्यात आले