अंजनगाव सुर्जी येथे विठलं मंदिरात महाआरती संपन्न
संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव येथे होणार;
बारी समाजाच्या वतीने करण्यात आली विठ्ठल मंदिर येथे महाआरती
अंजनगाव सुर्जी / नवप्रहार
गेली एक वर्षापासून समस्त बारी समाजाच्या वतीने शासनाला श्री संत रुपालाल महाराज ह्यांचे स्मारक, बारी समाज आर्थिक विकास महामंडळ, पान पिपरी व्यवासायकांना मदत ई मागण्या पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी अखिल भारतीय बारी महासंघाचे वतीने सतत मागणी रेटून धरण्यात आली होती त्याची पूर्तता शासनानेनुकतीच
बारी समाजाचे संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी येथे होणार असल्याची घोषणा दिनांक २८ जुन रोजी नुकतीच मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली असून गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला यश प्राप्त झाले म्हणून आज रविवार ३० जुन रोजी रात्री ८ वाजता विठ्ठल मंदिर येथे महाआरती चे बारी समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी समाजाच्या वतीने संत रुपलाल महाराज यांच्या समाधी स्थळाचे पुजण,हारार्पण व फटाक्यांची आतिषबाजी व संत रुपलाल महाराज यांच्या जय घोषणेने हा क्षण दिवाळी सारखा साजरा करून संत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांची महाआरती करण्यात आली.याप्रसंगी सर्व समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने विठ्ठल मंदिर येथे उपस्थित होते.