आ. पवार यांच्या समक्ष ‘लाडकी बहीण योजनेचे’ फॉर्म भरूनघेतले
उमरी (प्रतिनिधि):
तालुक्यात आज दि २२ जुलै २०२४ रोजी ८९ नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनातून व मा. पूनम ताई राजेश पवार यांच्या पुढाकाराने माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने उमरी तालुक्यातील सिंधी, शेलगांव, ढोल उमरी व हुंडा ग्रामपंचायत या गावच्या ग्रामपंचायत कार्यालय येथे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” चे ऑनलाईन फोर्म भरून घेण्यात आले.
या प्रसंगी नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार, उमरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रशांत थोरात साहेब, बापूसाहेब पाटील कौडगावकर, आणी बहुसंख्येने उपस्थित असलेले भाजपा कार्यकर्ते चारही गावाला उपस्थित होते. मौजे शेलगाव या गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आले या ठिकाणी तलाठी श्री एम. व्ही. राऊत, कोतवाल श्री उत्तम हनवते, ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा. प . ऑपरेटर, व भाजपा कार्यकर्त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची ऑनलाईन नोंदणी केली,
नोंदणी करताना सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, व सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी व लाभार्थी महिला उपस्थित होत्या. तसेच मौजे सिंधी व हुंडा ग. प. येथे सज्जाचे तलाठी तायवाडे साहेब हे उपस्थित होते. त्याच बरोबर ढोल उमरी येथील सज्जाचे तलाठी पांचाळ साहेब यांनी गावाची धुरा सांभाळून अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा. प. ऑपरेटर, सुशिक्षित तरुण तरुणी यांच्या मदतीने माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले.