शाशकीय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज मूर्तिजापूर येथे  विविध कामांचा लोकार्पण सोहळा

Spread the love
अकोला / प्रतिनिधी
            केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज अकोल्यात येणार आहे. त्यांच्या हातून लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार हरीश पिंपळे यांनी दिली आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी मुर्तीजापुर शहरात आज दीं .23 नोव्हेंबर बुधवार रोजी  येणार आहेत. त्यांच्या हस्ते  मुंबई नॅशनल हायवे बडनेरा ते अकोला या रस्त्याचे  लोकार्पण सोहळा तसेच मुर्तीजापुर कारंजा रोडच्या भूमिपूजन संपन्न होणार आहे. हा  सोहळा पिंजर एमआयडीसी रोड येथे दुपारी एक वाजता होणार आहे यासाठी आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली  बार्शीटाकळी मुर्तीजापुर या भागातील विकास प्रेमी  नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित  राहणार असल्याने कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहे.

 तसेच मुर्तीजापुर खेडा कारंजा या रस्त्याचे चौपदरीकरण व नवीनीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ नामदार नितीन गडकरी यांच्या उपस्थित होत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार प्रकाश भारसाकले, रणधीर सावरकर आमदार राजेंद्र पाटणी आमदार वसंत खंडेलवाल नॅशनल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ढगे जिल्हाधिकारी अजित कुंभार  आयुक्त निधी पांडे, आमदार धीरज लिंगाडे आमदार किरण सरनाईक आमदार अमोल मिटकरी, आमदार लखन मलिक प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे अशी ही माहिती आमदार पिंपळे यांनी दिली भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा आपले लोकनेते केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील विजय अग्रवाल अनुप धोत्रे जयंत मसने, तेजराव थोरात, भूषण कोकाटे, संजय इंगळे पाटील , महादेवराव काकड, हिरासिंग राठोड, राजेश रावणकर गजानन उंबरकर महेंद्र गोयंका विलास बोडके भिकाजी धोत्रे देवेंद्र देवर माधव मानकर संतोष शिवरकर,  वैशाली निकम,  अमित कावरे, मोनिकाताई गावंडे, प्रशांत पांडे, अशोक राठोड,  बाळासाहेब आपोतीकर  ,वारे, रमेश लोहकपुरे, उमेश पवार मनीराम टाले, सचिन देशमुख रावसाहेब  कांबे आधी पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज झाले आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close