क्राइम

विजय ढुमे हत्याकांडातील आरोपी गजाआड ; अवध्या 36 तासात लावला छडा 

Spread the love
पुणे / नवप्रहार मीडिया 

 
निवृत्त पोलिसाच्या मुलाच्या हत्याकांडात सामील असलेल्या आरोपींना पोलिसांनी अवध्या 36 तासात जेरबंद केले आहे. जुन्या प्रेयसीने नवीन प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने विजयची हत्या केली आहे. घटनास्थळावर उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली.
 
जुन्या प्रेयसीनेच काढला काटा

हत्येच्या घटनेनंतर गुन्हा दाखल करुन पुणे पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. संशयित आरोपीचा 60 ते 70 किलोमीटर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मागोवा घेतला. दुसरीकडे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींची नावे निष्पन्न झाली. तसेच मयताशी जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता समीर ढमाल हिच्याकडेही सखोल चौकशी केली. सर्व तपासात संशयाची सुई सुजाता ढमाल हिच्याकडेच जात होती. अधिक तपास केला असता आरोपी सुजाता हिने तिचा नवीन प्रियकर संदिप दशरथ तुपे (वय 27, रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्या मार्फत जुना प्रियकर विजय ढुमे याच्या हत्येचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. महिला आणि तिचा प्रियकर दशरथ तुपे यांना ताब्यात घेऊन तपास केला असता. हा खून त्याच्या इतर 5 साथीदारांमार्फत घडवून आणल्याचे समोर आले. त्याआधारे त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
कशी झाली होती हत्या?
विजय ढूमे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय हा लाईन बॉय होता. तो सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा होता. शहरातील राजकीय व्यक्तीसोबत त्याची उठबस होती. इतकच नाही तर अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तो सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्वालिटी लॉजमध्ये गेला होता. लॉज मधून बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली. या संपूर्ण घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजयचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close