विशेष

मृत्यू नंतर काय होते ? मृत्यू झालेल्या व्यक्तीने कथन केला अनुभव 

Spread the love

                         जीवणानंतर मृत्यू हे सगळ्यात पहिले आणि शेवटचे सत्य आहे असे म्हटल्या जाते. मृत्यू नंतर नेमके काय होते याबद्दल अनेक किवंदत्या आहेत.कोणी म्हणत की मेल्यावर  चित्रगुप्त नावाचा व्यक्ती तुमचे चाम्गले आणि वाईट कार्य वाचून दाखवतो आणि त्यांनतर तुमचे स्थान स्वर्गात आहे किंवा नरकात हे ठरवले जाते.अश्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण एका माणसाने मेल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. अर्थात यावर विश्वास करावा अथवा नाही हे ज्याचे त्याला ठरवायचे आहे. 

मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे. शिव ग्रेवाल हा ब्रिटनमधील लोकप्रिय रंगकर्मी असून तो 60 वर्षांचा आहे.

दहा वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका

10 वर्षांपूर्वी म्हणजेट 9 फेब्रुवारी 2023 रोजी मी आपल्या पत्नीसोबत लंडनमध्ये घराजवळ जेवत होता. त्यानंतर मला अचानक हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने घाईघाईने रुग्णवाहिका बोलावून मला हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे डॉक्टरांच्या पथकाने सीपीआर देऊन मला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढले. हा सर्व प्रकार सात मिनिटे सुरु होता.या सात मिनिटांत शिवने जे अनुभवले तो अनुभव त्याने शेअर केला आहे. मिररने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

‘माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळा झाला आहे,’ असे मला असे वाटले. मी स्वत: ला शून्यात, पूर्णपणे वजनहीन जाणवू लागलो होतो. जणू मी पाण्यावर तरंगत आहे, असे वाटू लागले.

“मग एक वेळ आली जेव्हा मी अंतराळविश्व पाहू शकत होतो. तेथे उल्का होत्या. एवढेच नव्हे तर मी चंद्रावर प्रवास करत असल्याचेही मला जाणवत होते. असे असले तरी मी लवकर माझ्या शरीरात परत जावे आणि माझ्या पत्नीसोबत आयुष्य जगावे, असे मला तेव्हा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटत होते.

शिवचे हे वक्तव्य सोशल मीडियात खूप चर्चेत आहे. यावर सर्वजण आपल्या प्रतिक्रिया देत आहे. मेलेला माणूस कधी जिवंत होत नाही, हा शिवचा भास आहे, अशी प्रतिक्रिया काहीजण देत आहेत. तर एखाद्याला असा अद्भुत अनुभव येऊ शकतो, असेही काहीजण व्यक्त होत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close