शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीसाठी युवक काँग्रेस चे बँक व्यवस्थापकाला निवेदन
दर्यापूर ( तालुका प्रतिनिधी) दिनांक 29 11 2023 वडनेर गंगाई येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ए टी एम मशीन, गोल्ड लोनची सुविधा व अतिरीक्त कर्मचारी यासाठी युवक काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले. वडनेर गंगाई हे तालुक्यातील मोठ गाव आहे. व सेंट्रल बँकेला वरूड, राजखेड, एरंडगाव, अंतरगाव ही गावे सलग्न आहेत. बँकेमध्ये कर्मचारी संख्या कमी आहे, ए टी एम मशीन सुरू नाही, गोल्ड लोणची सुविधा नाही यामुळे शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची गैरसोय होत आहे या सर्व गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी शाखा प्रबंधक यांना निवेदन सागर भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले त्याप्रसंगी रामदासराव रेठे, शाईबउल्ला भाई खान, सुभाषराव कोथळकर, सत्यविजय भाऊ वानखडे, निलेशराव देशमुख, सुधाकर भाऊ निवाणे, राजू भाऊ वानखडे, सय्यद मिसाक भाई, जब्बार भाई कुरेशी, ऋषीकेश भाऊ शेंगोकार, रोहित भाऊ काळे, राम भाऊ डिक्कर, सचिन भाऊ मांडोकार, राजेश भाऊ राक्षसकर, रवी भाऊ वानखडे, शैलेश भाऊ गावंडे इत्यादी युवक काँग्रेस पदाधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते*.