क्राइम

उसनवारी दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीला ढकलले वेश्याव्यवसायात

Spread the love

 पुणे / नवप्रहार मीडिया 

                    वडिलांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी उसनवारी घेतलेली  रक्कम परत करण्यास असमर्थ ठरलेल्या तरुणीला 15 दिवस डांबून ठेवून तिला वेश्याव्यवसायात ढकळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना भारती विद्यापीठ परिसरातील आहे. तक्रारी नंतर महिलेला अटक करण्यात आली असून पती फरार आहे. पोलीस ज्या लॉज वर मुलीला डांबून ठेवण्यात आले आहे त्या लॉज मालकाची चौकशी करणार आहे.

हा सगळा प्रकार ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पूनम माने (वय 22 वर्ष) आणि आकाश माने (वय 24 वर्ष) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असून पूनम माने हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी आकाश माने हा सध्या फरार आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. तसेच ज्या लॉजवर हा प्रकार घडला आहे.. त्या सर्व लॉज मालकांची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील आजारी असताना तिने आरोपी दाम्पत्ययाकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे मुलीला ते पैसे करता आले नाही.

त्यामुळे आरोपींनी 17 वर्षीय मुलीचं अपहरण केलं आणि तिला एका लॉजवर नेऊन तब्बल 15 दिवस डांबून ठेवलं. लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार बलात्कार देखील केला. यावरच न थांबता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले.

याबाबत परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील म्हणाल्या की, ‘तरुणी ही पुण्यात राहत होती आणि आरोपी हे तिच्या शेजारी राहत होते. पीडित मुलीच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि वडिलांच्या आजारपणासाठी तिने आरोपींकडून 30 हजार रुपये घेतले होते. पण आरोपी हे पैसे मागत असताना ते परत करण्यासाठी मुलीकडे पैसे नव्हते म्हणून ती टाळाटाळ करत होती. पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी 17 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं आणि तिला एका लॉजवर नेऊन तिला 15 दिवस डांबून ठेवलं. लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडले. याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत.’ असं यावेळी त्या म्हणाल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close