हटके

वाचा कुठल्या शाळेत सापडल्या दारूच्या बाटल्या, स्त्रियांचे अंतर्वस्त्र आणि ……

Spread the love
भोपाळ / विशेष प्रतिनिधी
               मध्यप्रदेश च्या मोरोनामध्ये एका मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापक (फादर) आणि व्यवस्थापकाच्या रूम मध्ये दारूच्या बाटल्या ,महिलांचे अंतर्वस्त्र तसेच आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या यानंतर जिल्हाधिकारी यांनी शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाल्यांच्या भविष्याला घेऊन पालकांत चिंतेचे वातावरण आहे.
                  मुलांनी शिकावे आणि चांगली कमाई करावी असे प्रत्येक आईवडिलांना वाटते. मुलांच्या शिक्षणासाठी पालक वाट्टेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा देत ते मुलांच्या शैक्षणिक  गरजा पुरविण्याकडे जास्त भर देतात. देशात असलेल्या मिशनरी शाळा या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेगवेगळे प्रलोभन देऊन आपल्या शाळेत त्यांच्या मुलांना ऍडमिशन घ्यायला प्रोत्साहित करतात. मुलांना शिक्षणा व्यतिरिक्त अन्य सुविधा मिळत असल्याने पालक देखील मूलांना मिशनरी शाळेत टाकतात.
                पण मोरोनामध्ये बाल संरक्षण पथकाच्या चमूने अचानक टाकलेल्या धाडीत जे काही आढळून आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिकांच्या भुवया
उंचावल्या आहेत.   बाल संरक्षण आयोगाच्या पथकानं अचानक धाड टाकली. त्यावेळी त्यांना शाळेत अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद करण्याचा आदेश दिला.
मध्य प्रदेशच्या बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या निवेदिता शर्मा यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या शेजारी असलेल्या मिशनरी स्कूलची तपासणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षण अधिकारी ए. के. पाठकदेखील हजर होते. निवेदिता शर्मांनी शाळेचे फादर (मुख्याध्यापक) आणि व्यवस्थापकांच्या खोल्यांची तपासणी केली. दोघांच्या खोलीतून दारुच्या विविध ब्रँडच्या १६ बाटल्या, कंडोमची पाकिटं आणि आपत्तीजनक सामान सापडलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शाळेत पोहोचून सामान जप्त केलं
शाळेत सापडलेल्या दारुच्या बाटल्यांची आणि आक्षेपार्ह साहित्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांना दिली. यानंतर अस्थाना यांनी शाळा सील करण्याचे आदेश दिले. मिशनरी स्कूल सील करण्यात आलं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शाळेच्या आडून नेमकं काय सुरू होतं, याचा तपास करण्यात येत आहे

धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी वापरलं जाणारं साहित्य, दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू शाळेत सापडल्या असल्याची माहिती बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या निवेदिता शर्मांनी दिली. या शाळेत चर्चदेखील आहे. शाळेच्या परिसरात कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मात्र ज्या खोल्यांमध्ये दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत, याकडे लक्ष वेेेधले.

एका व्यक्तीला राहण्यासाठी सात खोल्यांची आवश्यकता कशी भासते? या ठिकाणी १२ बेड आहेत. स्वयंपाकघर आहे, असं शर्मांनी सांगितलं. या ठिकाणी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकाचं वास्तव्य आहे. ‘मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकांच्या खोल्या ग्रंथालयाला लागून आहेत. नियमानुसार हे चुकीचं आहे. कोणीही व्यक्ती शाळेच्या परिसरात घर तयार करून राहू शकत नाही,’ असं जिल्हा शिक्षण अधिकारी ए. के. पाठक म्हणाले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close