क्राइम

या कारणाने भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकन पोलिसांनी केली अटक

Spread the love
वॉशिंग्टन / नवप्रहार वृत्तसेवा

                  अमेरिका पोलिसांना एका महिलेचा फोन येतो. फोनवर ती महिला तिचा मुलगा निपचित पडला असून कुठलीही हालचाल करत नसल्याचे सांगितले. पोलीस तिच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ती राहत असलेल्या घरात पोहोचली. तेव्हा त्यांना तिच्या १० वर्षीय मुलाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला. पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या गुन्ह्यात तिला अटक केली आहे.   प्रियांका तिवारी असं महिलेचं नाव आहे.  तिच्याविरोधात हत्येसह लहान मुलाचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              ३३ वर्षांच्या प्रियांका तिवारीनं ९११ वर कॉल करुन पोलिसांशी संपर्क साधला. मुलगा निपचित पडला असून तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलीस अधिकारी तिच्या घरी पोहोचले. त्यांनी सीपीआर दिला. पण मुलाच्या मृतदेहाची हालचाल जाणवत नव्हती.
मुलाचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. मुलाची हत्या अनेक दिवसांपूर्वीच झाल्याचं त्यांनी ओळखलं. अधिकाऱ्यांना घरामध्ये अनेक खाद्यपदार्थ दिसले. मृत्यूमुखी पडण्यापूर्वी मुलाचं वजन बरंच कमी झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. महिलेनं तिच्या मुलाला कित्येक दिवस खायला दिलं नव्हतं. त्याची उपासमार केली होती. महिला हे सगळं जाणूनबुजून करत होती. तिला मुलाचा जीव घ्यायचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण मुलाच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
पोलिसांनी प्रियांका तिवारीला अटक केली आहे. प्रियांकाचे भारतातील अनेक नातेवाईक गेल्या काही दिवसांपासून तिला फोन करत होते. पण तिनं कोणाच्याच कॉलला प्रतिसाद दिला नाही. महिलेचं नातेवाईक बरेच दिवस तिला भेटायला आले नव्हते. शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. प्रियांका मिळून मिसळून राहायची. ती असं करेल असं कधीच वाटलं नव्हतं, असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close