समतानगर फेज2 येथे गरजूना शिलाई मशिन व सायकल चे वाटप
सुलभा बहुउद्येशीय शिक्षण स़स्थाचा उपक्रम
भंडारा / प्रतिनिधी
गौतम बुध्द वार्डातील समता नगर फेज2 येथिल प्रज्जव पँरामेडिकल इन्ट्यिट्यूट च्या सभागृहात दि.13 मार्च रोजी शहरातील गरजू महिलाना व शैक्षणिक शिक्षण घेणारे विद्यार्थीना शिलाई मशीन व सायकलचे वाटप सुलभा बहुउद्येशिय शिक्षण संस्थाचे वतीने वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष डाँ.सुलभा मेश्राम होते तर प्रमुख उपस्थित संस्था सचिव प्रा.डाँ.बबन मेश्राम,अँड.कमरुनकिया मानकर,प्रा.जोत्सना सुर्यंवशी,तुसार कुरेंजकर आदि मान्यवर होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अँड मानकर यांनी महिलाचे कायदेविषयक सविस्तर माहिती दिली तर प्रा.डाँ.बबन मेश्राम यांनी शिलाई मशीन योजना हि आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरीबसुन स्वतःचा उद्योग सुरु करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. जेणेकरून महिला शिलाई मशीन वर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील असे सांगितले.
प्रा.सुर्यवंशी यांनी सांगितले की महिलानी स्वकर्तूवाने कार्य करुन समाजात स्थान निर्माण करावे.
अध्यक्षीय भाषणातून डाँ.सुलभा मेश्राम यांनी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगाराची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशीन चे वाटप मागील अनेक वर्षापासून करण्यात येते असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन शिल्पा पेंदाम हिने तर आभार प्रदर्शन प्रियंका मेश्राम हिने केले.यश्वीतेकरीता सुकेशनी कुभंलकर,प्रियंका नागापुरी,अंकिता शहारे,दुर्गा तिलगामे,नदिनी डहाके,साक्षी लुटे,साक्षी केवट,रवीना बोरसरे,पल्लवी समरीत,स्वाती उके,तनुजा यांनी सहकार्य केले.