सामाजिक

निराधारांच्या विनाकारण चकरा डीबीटीसाठी चक्क हयातीचे सादरीकरण तहसीलचे अंतर दूर;ऑटोचा खर्च परवडेना

Spread the love

 

यवतमाळ : निराधार योजनेतून महिन्याकाठी मिळणाऱ्या अनुदानाला मिळविण्यासाठी निराधारांच्या विनाकारण चकरा वाढल्या आहे. डीबीटीसाठी केवळ आधार आणि बँकेचे पासबुक हवे परंतु,लाभार्थ्यांना योग्य माहिती नसल्याने ते हयातीचे प्रमाणपत्र घेऊन दूर अंतरावरील तहसील कार्यालयात गर्दी करीत आहे या अनाठायी प्रकारावर आळा घालण्याची मागणी आज गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी नायब तहसीलदारांकडे केली.
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ वृद्धपकाळ,इंदिरा गांधी निवृत्तीवेतन सारख्या योजनेतून निराधारांना अर्थसहाय्य दिले जाते परंतु,योजनेतील लाभार्थ्यांना थेट डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्याच खात्यात अनुदान वळते केले जाणार आहे. त्यासाठी डीबीटी प्रकियेसाठी आधार आणि बँकेच्या पासबुकची गरज असताना लाभार्थी हयात प्रमाणपत्र घेऊन तहसील कार्यालयात गर्दी करीत आहे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी आज नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांची भेट घेऊन डीबीटीच्या प्रक्रियेची जनजागृती करण्याची मागणी केली. शहरापासून तहसील कार्यालय लांब गेल्याने तेथे येण्यासाठीचा खर्च परवडत नाही डीबीटी प्रक्रियेला सेतू केंद्रातून पूर्ण करण्याची तरतूद केली जावी,अशी मागणीही गेडाम यांनी आपल्या निवेदनातून केली. यावेळी भाऊराव वासनिक,रंगीला चौधरी,मंदा मानकर,मामा तकलीफचंद,शाम उर्फ जादूगार राठोड,नंदू रणगिरे,नेवला,सुहास कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तहसीलदारांकडून डीबीटी जनजागृती अतिआवश्यक – गुरुदेव

निराधार योजनेतील अनुदानावर अनेकांची भिस्त आहे. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होतो त्यामुळे ही योजना आपल्याला सुरु राहावी याकरिता जीवचे रान करताना लाभार्थी दिसून येत आहे. परंतु,त्यांना डीबीटी आणि हयात यातील फरक कळत नसल्याने त्यांची दैना सुरु आहे. त्यामुळे तहसीलदारांनी डीबीटी विषयी जनजागृती करणे आजघडीला अतिआवश्यक आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close