क्राइम

मोटरसायकलच्या शिटमध्ये चटई विक्रीच्या नावावर गांजाची विक्री ४३.५४० किलो गांजा व इतर साहित्य जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी

मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री विशाल आनंद यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २४/०५/२०२३ रोजी नागपूर विभागात अवैध धंदे विरूद्ध कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन मिळाली की, मौजा चिमनाझरी शिवारातील राजस्थानी धाब्याजवळ मोटरसायकलने गांजा विक्री करीता इसम येणार आहेत प्राप्त माहितीनुसार राजस्थानी धाब्याजवळ बाजूचे मोकळया जागेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहताच पोलीसांना पाहुन तीन इसम पळुन गेले. ते बसलेले असलेल्या ठिकाणी त्यांचे मोटरसायकलीची झडती घेतली व मोटरसायकलवर बांधलेल्या चटईची झडती घेतली असता मोटरसायकलच्या सिट व चटई मध्ये ४३.५४० किलो हिरव्या रंगाचे ओलसर गांजा किंमती ४३५४०० /- रू. वाहन क्र. १) यु.पी. – ७४ ए.डी – ८९११ २) एम.एच-४० ए. वाय- ८९३९ ३) आर. जे. ०७ / जी.एस – ६२८२ नमुद ठिकाणावरून तिन मोटरसायकली, ०३ मोबाईल व इतर साहित्य व ४३.५४० किलो हिरव्या रंगाचे ओलसर गांजा किंमती ४३५४०० /- रूपयाचा असा एकुण ६,९१,३०० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून आरोपीने सोडलेले सामानामध्ये डेबिट कार्ड, वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. तसेच जोडे, कपडयांच्या बॅगा जप्त करण्यात आलेल्या आहे. सदर बाबत पोलीस स्टेशन बेला येथे अनोळखी तिन आरोपीतांविरूद्ध कलम ८ (क), २० ( ब ) II (क) NDPS ACT 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, सहायक फौजदार चंद्रशेखर घडेकर, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, दिनेश आधापुरे, पोलीस नायक अमृत किनगे, विपीन गायधने, रोहन डाखोरे, मयुर ढेकळे, चालक पोलीस शिपाई सुमित बांगडे यांच्या पथकाने पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close