रस्ता दुरुस्ती करून बससेवा सुरु करण्याची युवासेना व शिवबा संघटनेची मागणी .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील निघोज हे लोकसंख्येने मोठे असणारे गाव आहे. येथील कुंड पर्यटन स्थळी जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून तो दुरुस्त होणे गरजेचे आहे तर या मार्गावरून शिक्रापूर ते पुणे ही बस सेवा सुरु करण्याची मागणी पारनेर तालुका युवा सेना व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे यांनी पत्रकाव्दारे केली आहे .
या ठिकाणी असणारे जागतिक किर्तीचे कुंड पर्यटनस्थळ हे गावापासुन ३ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पर्यटकांचे अपघात या मार्गावर दररोजचेच झाले आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निघोज या मार्गे कुंड पर्यटन स्थळ – शिक्रापुर – पुणे ही अत्यंत गरजेची असलेली बससेवा सुरू करावी . निघोज व परिसरातुन अनेक व्यापारी व नागरिक विविध कामांसाठी पुणे येथे ये जा करत असतात. त्यामुळे कुंड पर्यटन स्थळाला भेटी देण्याचे प्रमाण वाढून त्याचा व्यवसाय वाढीलाही फायदा होईल . म्हणुन ही बससेवा सुरू होणे गरजेची आहे.
या दोन्ही मागणी बाबत युवासेना व शिवबा संघटनेच्या वतीने बससेवा व कुंड रस्ता दुरुस्ती चे निवेदन खा. निलेश लंके , पारनेर व शिरूर आगार प्रमुख ,उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती व इतरांना देण्यात आले.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख तथा शिवबा संघटना अध्यक्ष अनिलराव शेटे , शेतकरी संघटना उप तालुका प्रमुख किसन चौधरी , शैलेश ढवळे, उप तालुका प्रमुख दत्ता टोणगे ,उप तालुका प्रमुख नागेश नरसाळे ,उप तालुका प्रमुख मोहन पवार ,उप तालुका प्रमुख सुयोग टेकुडे ,शिवबा युवक अध्यक्ष यश रहाणे,नवनाथ वरखडे,शांतारम पाडळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कुंड पर्यटन स्थळ हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असून त्याच्या अधिकाधिक विकासासाठी रस्ते विकास व प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी या दोन्ही मागणींकडे अनिलराव शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर तालुका युवा सेना व शिवबा संघटनेने लक्ष वेधल्याने निघोज ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे . ]