बॅकेतुन ग्राहकाचे अडीच लाख लंपास
बँक परिसरात खळबळ ;परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अचलपूर प्रतिनिधी : किशोर बद्रटिये -:: स्थानिक पंजाब नॅशनल बँकेत अज्ञाताने बॅकेतच अडीच लाख रुपये लंपास केल्याने बँक परिसरात एकच खळबळ उडाली. परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयीत आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
सुनील आमोकार वय 37 रा. नरसाळा हे खाजगी कंपनीत काम करतात. ते दि. ३० ला दुपारी अडीचच्या सुमारास 14,20591 रुपये पंजाब नॅशनल बॅक शाखेत भरण्यासाठी बँकेतील कॅश डीपॉसीट काऊंटरचे लाईनमध्ये उभे होते. तर यावेळी बरेच लोक लाइनमध्ये होते. कॅश काऊंटर वर पोहचल्यावर बॅग पाहताच बॅगची चैन उघडी दिसली त्यांना संशय आला त्यांनी तात्काळ बॅगमधील कॅश मोजली असता त्यात एकुन 1420591 रुपये पैकी 1170591 रुपयेच होते. व 250000 रु कमी भरले. त्यांनी संपूर्ण बँग चेक केली परंतु बॅगमध्ये ठेवलेले 500 रुपयांचे 5 बंडल एकून 250000 रुपये कुठेच दिसले नाही. त्यांनी याबाबत त्यांच्या अधिकाऱ्यांना व बँक अधिकाऱ्यांना माहिती दिली .बॅक मध्येच रोख रक्कम लंपास झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याच्या भावना नागरिकांनी बोलून दाखवल्या.
कॅश डीपॉसीट काऊंटरच्या लाईन मध्ये कोणीतरी अज्ञात चोराने 250000 रुपये काढुन चोरुन नेल्याबाबतच तक्रार सुनील देवराव आमोकार यांनी परतवाडा पोलीसांना दिली आहे.