आघाडी आणि युती मध्ये वर्ध्याची उमेदवारी कुणाला?
महाविकास आघाडीमधून काँग्रेस आणि वंचित आग्रही तर महायुतीमधून भाजपच दावेदार
वर्धा प्रतिनिधि
आशिष इझनकर
– महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असताना आता वर्ध्याच्या जागेवर काँग्रेस मधील स्थानिक नेत्यांनी दावा केला आहेय. तर महायुतीत वर्ध्याच्या जागेवर विद्यमान खासदार निवडणूक लढतात की, आणखी दुसराच दावेदार ठरतो यावर चर्चा रंगते आहे. वर्ध्यात 2019 मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी झालेली लढत यावेळी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र वर्धा लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आघाडीत समावेश झालाच तर वंचित बहुजन आघाडी वर्धा आपल्यासाठी सुटावे यासाठी प्रयत्न करीत आहे.
– लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्ध्यातून काँग्रेस आपला उमेदवार आजवर रिंगणात उतरवीत आले आहे. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वर्ध्यावर आपली दावेदारी केलीय. वंचित बहुजन आघाडी देखील वर्धा लोकसभेसाठी आग्रही आहे, वंचितने तर येथे प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणा देखील करून टाकलीय. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे वर्चस्व नसणाऱ्या या क्षेत्रात कॉंग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक नेते काँग्रेस श्रेष्ठींना भेटायला गेले. वर्ध्यातला परंपरागत मतदारसंघ काँग्रेस सोडायला तयार नाहीए. चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली नसली तरी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल हे भाजपला टक्कर देण्यासाठी तयारीत आहेय. त्यामुळे काँग्रेसमधून शैलेश अग्रवाल, माजी आमदार अमर काळे आणि शिरीष गोडे ही नावे वाचली जात आहेत.
– दुसरीकडे मूळचे अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी वर्ध्यात बैठकांचा सपाटा लावलाय. वरुड – मोर्शी आणि धामणगाव ही दोन विधानसभा क्षेत्रे वर्ध्यात येतात, त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने खेळी करीत वर्ध्यावर दावा केलाय. पण माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख हे देखील शरद पवार गटातील तिकिटासाठी आग्रही आहे, त्यामुळे काही दिवसावर असणाऱ्या तिकीट वाटपात कुणाचे पारडे जड ठरते, हा कळीचा मुद्दा आहे.
– आता पाहूया महायुतीत काय चाललेय ते… महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या अशोक शिंदे यांच्याकडून दावा होतो आहे, अजित पवार गटातून आजवर वर्ध्याची आस लावून असणारे माजी केंद्रीय मंत्री आता वर्ध्यात फिरताना दिसत नाहीए, त्यामुळे सुबोध मोहिते यांनी समझोता केल्याचे बोलले जातेय, तर विद्यमान खासदार भाजपपुढे वर्ध्यात कुठले आव्हानच नाही, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. वर्ध्यासाठी भाजपकडून भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, उदय मेघे आणि रामदास आंबटकर आणि आता अलीकडे सागर मेघे ही नावेही चर्चेत आहेय.
– अवघ्या दोन दिवसावर असलेल्या जागा वाटपात जो – तो आता माझाच नंबर म्हणतंय खरं…. पण नेमकं कुणाचं नशीब उजाडणार हे येणारा काळच ठरवेल.