राज्य/देश

उद्धव ठाकरे हजर नसतांना काय घडले मातोश्रीवर 

Spread the love
 

मुंबई / नवप्रहार डेस्क 

                 निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यावर सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. आता पक्षातील नेत्यांच्या नजरा तिकीटी वर लागल्या आहेत. पक्षश्रेष्ठी आपल्या लोकांना आश्वत करत आहेत. जेणेकरून त्यांनी वेळेवर दगाफटका करायला नको. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने तैयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या काही विद्यमान आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे.

विद्यमान आमदारांना उमेदवारीचाही शब्द दिला आहे. उद्धव ठाकरे अनुपस्थितीत ही बैठक सुरु आहे. ठाकरेंच्या अनुपस्थितीतच ठाकरे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे अनुपस्थितीत असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांना आज एबी फॉर्म देण्यात आले नाहीत. मात्र लवकरच त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. तसेच उमेदवारीची यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

आज मातोश्रीवर विद्यमान आमदारांना विधानसभा निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत प्रत्येक आमदारांसोबत वैयक्तिकरित्या भेट घेतली जात आहे.

आदित्य ठाकरे वैयक्तिकरित्या आमदारांसोबत चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरु आहे. उद्धव ठाकरे बैठकीत नाहीत. तब्येतीच्या कारणास्तव ते बैठकीत नाहीत. तर आज मातोश्रीवर उपस्थिती न राहणाऱ्या आमदारांची कारण अस्पष्ट आहेत. यामध्ये अजय चौधरी, उदयसिंग राजपूत, प्रकाश फातर्पेकर यांचा समावेश आहे.

मातोश्रीवर कोणते आमदार उपस्थित आहेत?

आदित्य ठाकरे

सुनील प्रभू

सुनील राऊत

राजन साळवी

ऋतुजा लटके

संजय पोतनीस

कैलास पाटील

रमेश कोरगांवकर

भास्कर जाधव

शंकरराव गडाख

वैभव नाईक

नितीन देशमुख

राहुल पाटील

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close