राजकिय

बीड जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार ; तीन शिलेदारांनी सोडली साथ 

Spread the love

मुंबई / नवप्रहार प्रतिनिधी 

                महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काही न काही नवीन घडत आसल्याने देशपातळीवर या बाबीची चर्चा हित असते. अश्यातच राजकीय क्षेत्रातून एक नवीन बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील दोन युवा प्रमुख आणि महिला आघाडी अध्यक्षांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हा उध्दव ठाकरे यांच्या साठी मोठा धक्का मानला जात आहे. हे तिन्ही लोक आपल्या समर्थकांसह आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 

शिवसेना युवा जिल्हा प्रमुख रवीराज बडे, शिवसेना युवा जिल्हा प्रमुख गजानन कदम आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगिता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संगिता चव्हाण या राज्य महिला आयोगाच्या सदस्य देखील आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या पुढाकारानं आज शिवसेना ठाकरे गटातील या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. बीड जिल्हा युवा सेनेचे दोन जिल्हाप्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आज मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बीडमधून पाचशे गाड्यांचा ताफा हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या या पदाधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close