या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महिला झाल्या निर्वस्त्र
गुणा (मध्यप्रदेश ) / नवप्रहार डेस्क
न्यायासाठी आलेल्या महिला जिल्हाधिक्कारी यांच्या दालनात निर्वस्त्र झाल्याने एकच गोंधळ माजला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यावर संतापलेल्या महिला शांत झाल्या. चला तर जाणून घेऊ या प्रकरण काय होते.?
उपलब्ध माहिती नुसार लग्नाच्या दिवशी चोरीच्या आरोपाखाली पकडला गेलेल्या नवरदेवाला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने हादरलेल्या नातेवाईक महिलांनी न्यायाची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात एकच गोंधळ घातला.
त्यानंतर संतापलेल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात निर्वस्त्र झाल्या. अखेर जिल्हाधिकारी डॉ. सतेंद्र सिंह यांनी त्या महिलांना योग्य तपास आणि कारवाई करण्याचा आश्वासन दिले त्यावेळी त्या परतल्या.
गुना जिल्ह्यातील झांगर चौकी पोलिसांनी रविवारी देवा पारदी आणि त्याचा काका गंगाराम पारदी यांना अटक केली होती. त्याच दिवशी देवाच्या लग्नाची मिरवणूक गुणा शहरातील गोकुळसिंग चक्क येथे जाणार होती. पण त्याच दिवशी रात्री देवाच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मिनी ट्रक भरून महिलांनी जिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी देवाच्या नववधूने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मावशी सूरजबाई यांनी स्वतःला पेटवून घेतले. दुसऱ्या दिवशी सोमवारी भोपाळमध्ये शवविच्छेदन करण्याच्या मागणीवर कुटुंबीय अडून राहिले होते. दंडाधिकारी चौकशीच्या आधारे त्यांनी ते मान्य केले.
देवाचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयातील जनसुनावणीत पोहोचले होते. नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करत आपला आक्रोश व्यक्त केला. तो इतका वाढला की महिलांनी आपले कपडे उतरवले. त्याचबरोबर पोलिसांना धक्काबुक्कीही केली. घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे पोलीस छावणीत रुपांतर करण्यात आले. पीडित कुटुंबातील महिलांना जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहींना किरकोळ दुखापतही झाली.
अॅडिशनल एसपी मान सिंह ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्याना परिसरातील भिडरा गावातील चोरी संबंधी चौकशीसाठी देवा पारदी आणि त्याचा काका गंगाराम पारदी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारी सायंकाळी दोघांना चोरीचा माल परत घेण्यासाठी नेण्यात येत होते. यावेळी देवाला छातीत दुखू लागले. त्याला म्याना रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे 45 मिनिटे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सीपीआरही देण्यात आला, मात्र त्याला वाचवता आले नाही. देवावर 7 गुन्हे दाखल आहेत.