सामाजिक

अयोध्या येथून आलेल्या पुजीत अक्षद कलशाचे धामणगाव नगरीत वितरण सोहळा….

Spread the love

१ ते १५ जानेवारी पर्यंत घरो घरो देण्यात येणार निमंत्रण..


धामणगाव रेल्वे:-
प्रभू श्रीरामचंद्र यांचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ ला  धर्मगुरू साधू संत व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. याच अनुषंगाने अयोध्या येथून आलेल्या पुजीत अक्षद कलशाचे धामणगाव नगरीत वितरण करण्यात आले….
याच पार्श्व भूमीवर अयोध्या येथून श्रीराम मंदिर ट्रस्ट कडून आलेल्या पूजित अक्षद कलश नुकतेच धामणगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालय सेवा स्मृती भवन येथे वितरीत करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात अमरावती विभाग संघचालक शेखर भोंदू प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर राठी, अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे,अमरावती विभाग प्रचारक विष्णू देशमुख ,अभियानाचे संयोजक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे रुपेश राऊत,सह संयोजक राजेश झंवर व जिल्हा कार्यवाह निखिल मोहोड उपस्थित होते. येणाऱ्या १ जानेवारी पासून तर १५ जानेवारी २०२४ पर्यंत अक्षद निमंत्रण अभियान संपूर्ण देशभरात संघ, विहीप, बजरंग दल व अनेक संघटना, समाजातील सज्जन शक्ती अश्या सर्वच मिळून करणार आहेत.गेल्या ५५० वर्षा पासूनच सुरु असलेला हा संघर्ष आणि आता प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र यांचे उभे होत असलेले मंदिर व रामलला यांची होणारी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा याची संपूर्ण राम भक्तांना उत्कंठा लागलेली आहे.
असे विचार याप्रसंगी शेखर भोंदू यांनी व्यक्त केले.अयोध्या येथून आलेल्या पूजीत अक्षद कलश श्रीराम मंदिर येथे पूर्ण भक्तिमय वातावरणात आरती पूजन पुष्प अर्पण करून अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील तालुका समिती कडे वितरीत करण्यात आले.यावेळी चंद्रशेखर राठी यांच्या हस्ते विविध तालुका समितीचे संयोजक सह संयोजकांना पुजित अक्षद कलश वितरीत करण्यात आले.या मंगलमय प्रसंगी लोणी, भातकुली,आष्टी ,वलगाव, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे,तिवसा, मोर्शी ई.तालुक्यातून मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close