Uncategorized

महाराष्ट्र बँकेच्या चुकीचे प्रकारामुळे चौकशी अंती गुन्हा दाखल होण्याचे जिल्हाधिकारी यांचेकडून संकेत

Spread the love

महाराष्ट्र बँक नेहमी शेतकऱ्याप्रति वादाच्या भोवऱ्यात

शेतकऱ्याच्या परस्पर कर्ज वसूली प्रकरणाची

जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे )

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका शेतकऱ्याचा बँक ऑफ महाराष्ट्र ने केलेल्या कर्ज वसुली प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे ह्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून वेळ पडलास व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याबाबत माहिती अशी की, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी रमेष सावरकर यांच्या जवळ अडीच एकर शेती असून सन 2016 मध्ये त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे 95 हजार रुपये कर्ज घेतले होते. 2019 च्या कर्जमाफी साठी पात्र यादीत त्यांचे नाव असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला होता. अंजनगाव लोक न्यायालयात बँक ऑफ महाराष्ट्र सदर प्रकरण दाखल करून त्यांना नोटीस दिली होती. 72 हजार रुपयात तुमचे सेटलमेंट करण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकाने सदर कास्तकारला सांगितल्यानंतरही बँक व्यवस्थापकाने सदर कास्तकाराची दोन लाख रुपयाची फिक्स डिपॉझिट मधील एक लाख 86 हजार रुपये कर्ज खात्यात परस्पर भरून घेतल्याने सदर कास्तकार बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आत्महत्या करण्यास गेले होते. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी घेतली असून याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. चौकशी होताच बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आज अमरावती येथे पत्रकारांना सांगितले. सदर प्रकरणाची रीतसर तक्रार लखाड येथील शेतकरी रमेश सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. सदर प्रकरणात आता बँक अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र च्या या व्यवस्थापकाविरुद्ध अलीकडे अनेक तक्रारी वाढल्या असून परंतु बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमध्ये केल्या जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले असून, त्या बाबीकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे

आणि जिल्हाधिकारी गहिवरल्या
महाराष्ट्र बँकेच्या गैर प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनांत रमेश सावरकर या अल्पभूधारक शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र ने अन्यायकारक केलेल्या कर्ज वसुलीची तसेच बँकेच्या समोर आत्महत्या करीत असल्याचे आपबीती सांगताच जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर मॅडम दोन मिनिट स्तब्ध होऊन अक्षरशः गहिवरल्या आणि शेतकऱ्याला तुम्ही असे करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर देऊन बँकेच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
Click to Join Our Group