युवा एल्गार विद्यार्थी संघटनेच्या उपोषणाचा बारावा दिवस

यवतमाळ( वार्ता )
अरविंद वानखडे
यवतमाळ येथील स्थानिक आजाद मैदान मध्ये गेल्या बारा दिवसापासून युवा एल्गार संघटनेच्या वतीने धनंजय वानखडे हे विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले आहेत. अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचे शासकीय अधिकारी यांनी उपोषण मंडपाला साधी भेट सुद्धा दिली नाही. त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून बी आर एस पार्टीचे, उपसमावायक दीपक भाऊ कॉम्पलेवार यांनी सुद्धा दिनांक 24 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. शासनाने 62 हजार शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय समाज हिताच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतो शिक्षणाचे खाजगीकरण करणे म्हणजे संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेणे असे होय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो शिक्षणाचा अधिकार दिला तो शिक्षणाचा अधिकार सर्वसामान्यांपासून हिसकावून घेण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे या सर्व शाळांचे खाजगीकरण झाले तर महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेचे काय होणार, याचे विपरीत परिणाम महाराष्ट्रातील जनतेला भोगावे लागणार आहे. शासनाने आमच्या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन उभारण्यात येईल व सर्व शाळा कॉलेज बंद सुद्धा पाडण्याचा निर्णय एल्गार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. आमच्या उपोषणाला आम आदमी पार्टीचा तसेच बी आर एस पार्टीचा पाठिंबा असून, जिल्ह्यातील विविध संघटनांचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षाने जर आमचा आवाज विधानसभेत मांडला तर यावर तोडगा निघू शकतो परंतु सर्व राजकीय पक्ष सत्तेत असणारे असो विरोधी बाकावर बसणारे असो सर्व मूंग घेऊन गप बसतात. ( कारण सर्वच एकाच माळीचे मनी असतात )
लोकजागर अभियानाचे विदर्भ प्रवक्ते अलोने साहेब, संस्थापक प्राध्यापक ज्ञानेश्वर वाकुडकर उपोषण मंडपाला भेट देऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. आमच्या उपोषणाला व पुढील आंदोलनाला भिम टायगर सेनेच्या महिला अध्यक्ष ममता काळे, इंडिया पॅंथर सेना चे सुरज भाऊ लोंढे यांनी सुद्धा पाठिंबा दिला असल्याचे उपोषण करते धनंजय वानखेडे यांनी एका पत्रकातून म्हटले आहे.