शैक्षणिक

तुमसर च्या महर्षी विद्या मंदिर सी.बी.एस.ई. शाळेची मान्यता रद्द. पालकांच्या आंदोलनाची घेतली दखल.

Spread the love

 

अवैध FEES वसूली करने,
अवैध पने शाळा स्थलांतरित करने,
शासनमान्य NCERT च्या पुस्तकां तून न शिकवीता खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकां अवाढव्य भावाने विकणे,
विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रासाठी FEES ची मागणी करने आदी प्रकरण भोवले.

भंडारा / प्रतिनिधी

पालकांच्या आंदोलनाची दखल घेत तुमसर येथील महर्षी विद्या मंदिर ह्या CBSE शाळेची मान्यता अखेर प्रशासनाने आदेश काढून रद्द केली आहे. शाळेवर कार्यवाही साठी पालकांनी गटशिक्षणाधिकारीच्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन केले होते. विशेष म्हणजे ह्या आंदोलनात पालकां समवेत पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले व उपसभापती हिरालाल नागपुरे सुद्धा सहभागी झाले.
सन 2017 पासून शाळा अवैध पने स्थलांतरित करने शाळेला भोवले आहे. नियमानुसार शाळा स्थलांतरित करान्यासाठी मोठ्या प्रमाणात परवानग्या घेण्याची आवश्यकता असते. परंतु महर्षी शाळेने अवैधपणे पाच वर्षा आधी शाळा तुमसर येथून तुडका ह्या ग्रामपंचायत असलेल्या गावात स्थलांतरित केली. ह्या सोबतच शाळेतून नियमानुसार शासनमान्य NCERT च्या पाठ्यपुस्तकातून न शिकाविता निव्वळ नफा कमावण्यासाठी अवाढव्य भावात अवैधपणे खाजगी प्रकाशनाच्या पुस्तक विक्रीचा गोरखधंदा शाळेने सुरू ठेवला होता. सोबतच (PTA) पालक शिक्षक संघाची रीतसर स्थापना न करता FEES आकारने, फीस न भरल्यास निकालपत्र न देणे आदी कटकारस्थान शाळा प्रशासनाद्वारा करण्यात येत होते. ह्या संदर्भात पालकांनी मागील अनेक वर्षापासून शेकडो तक्रारी केल्या होत्या.
याचीच दखल घेत अखेर पालकांनी शिक्षा बचाओ आंदोलन समितीचे प्रवीण उदापुरे, योगेश रंगवानी, आशिष कुकडे, अनिल गभने, योगेश बुचे यांचे नेतृत्वात थेट पंचायत समितीत शिक्षणाधिकारी च्या कक्षात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे पालकांच्या ह्या आंदोलनात पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले व उपसभापती हिरालाल नागपुरे सुद्धा सहभागी झाले. यासोबत शेकडो पालक सुद्धा सहभागी झाले होते.
शाळा मान्यता रद्द झाल्याने त्वरित महर्षी शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करून संपूर्ण रेकॉर्ड सिल करण्यात येईल, तसेच शाळेतील ९०० विद्यार्थ्यांना इतरत्र हलविले जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी मार्फत देण्यात आले आहे. आंदोलनात तुमसर पंचायत समिती सभापति नंदू राहंगडाले उपसभापति हीरालाल नागपुरे, शिक्षा बचाओ आंदोलनाचे प्रविण उदापुरे, योगेश रंगवानी, आशीष कुकडे, योगेश बूचे, अनिल गभणे, गुलराजमल कुंदवानी, दिनेश ढोके, योगेश सोनकुसरे, नितीन निनावे, सतीश सार्वे, बालू ठवकर, अनिल पाण्डेय, अन्ना वाडीभस्मे, डाॅ. भजनकर, डाॅ लिया भजनकर, शालिनी बागड़े, कल्पना मलेवार, कुशल भोयर, दिनेश पंचबुधे आदी सह शेकडो पालक सहभागी झाले होते.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close