फडणविसांनी राऊतांना संबोधले बाजारबुणगे तर उद्धव ठाकरे म्हणतात राज्याचे गृहमंत्री कमकुवत

मुंबई / विशेष प्रतिनिधी
राज्यात सध्या परस्परांवर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेते राज्य सरकार मधील नेत्यावर तर राज्य सरकार मधील नेते महाविकास आघाडीतील नेत्यांवर तोंडसुख घेतात. संजय राऊत यांनी मोदींवर टीका केल्याने चंद्रकांत पाटील यांनी त्याला उत्तर दिले आहे. तर फडणवीसांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतांना त्यांना बाजारबुणगे म्हटले आहे. तर ठाकरे यांनी फडनवीसांना कमकुवत आणि लाळघोटेपणा करणारा संबोधले आहे.
खासदार संजय राऊत सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही ते उपरोधात्क टिका करत आहेत. या देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांदणे मोदींमुळेच पडते. नद्यांचे वाहणे, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांनी केलेल्या या टिकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांना टोला लगावला आहे.
भाजप नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. तुरुंगात जावे लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही, असेही पाटील यांनी म्हटले. तर, फडणवीस यांनीही तसाच पलटवार संजय राऊत यांच्यावर केला आहे. तसेच, राऊत यांना बाजारबुणगे म्हणत प्रहारही केलाय.
अलीकडच्या काळात बाजारबुणगेही पंतप्रधान मोदींवर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो, अरे वेड्यांनो सुर्याकडे पाहून थुंकाल तर ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. या बाजारबुणग्यांना राऊत,फाऊद, दाऊद यांना सांगून देतो, मोदींकडे तोंड करुन थुंकण्याचा प्रयत्न करू नका, ती थुंकी तुमच्याच चेहऱ्यावर पडतेय. आणि तो थुंकीने लगबगलेला चेहरा पाहण्याची इच्छा कोणाचीही नाही, असे म्हणत फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. सावरकर गौरव यात्रेतील भाषणात फडणवीसांनी हा निशाणा साधला.
तर दुसरीकडे ठाकरे यांनी राज्याला एक कमकूवत आणि फडतूस उपमुख्यमंत्री लाभला आहे. जो केवळ लाळघोटेपणा करत फडणवीसी करत फिरतो, अशा धारधार शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाणे (Thane) येथे रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्लात त्या जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्याच्या गृहमंत्र्याचा लाळघोटेपणा इतका वाढला आहे की, त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंतर काहीही कारवाई करता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रालयाचा कारभार झेपत नसेल तर त्यांनी त्या पदावरुन बाजूला व्हावा. जेणेकरुन राज्यात जे काही सुरु आहे त्याचा ठपका त्यांच्यावर येणार नाही. राज्याच्या जनतेशी प्रामाणिक राहून त्यांनी हे करावा, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारबद्दल काय उद्गार काढले हे आपणास माहिती आहे. सरकारच नपुंसक म्हटल्यावर आपण आपेक्षाच कोणाकडून कारायची. ठाणे म्हणजे जीवाला जीव देणारे ठाणे. शांत आणि समृद्ध अशी ओळख असलेल्या ठाण्याची ओळख गुंड महिलांचे ठाणे अशी झाली आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. न्यायालयाने नपुंसक म्हटल्यावर आता महिला गुंडांना सोबत घेऊन सोबत घेऊन हल्ले केले जात आहेत. हे सुद्धा नपुंसक पणाचेच लक्षण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले महिलांकरवी घरात घुसून हल्ले केले जात आहेत. आम्हालाही घरात घुसता येते. पण, तसे करुन राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवायची का? तुम्हाला ते चालणार आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.