घाटंजी ता. काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेल अध्यक्षपदी प्रा.जितेंद्र जुनगरेची निवड
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सध्या घाटंजी तालुक्यात सर्वच पक्षाची पक्ष मजबुती कार्यक्रम जोमात सूरु आहे.अशा पक्ष वाढीसाठीच्या वातावरणात कॉग्रेस पक्ष ही मागे नाही. अनेकदा न.प.सत्ता प्रस्थापित करणारा कॉग्रेस पक्षही पक्ष मजबुती करीता प्रयत्नशील आहे असून शहरासह तालुक्यात काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते,पक्षाचे ध्येय -धोरण घर-घरात पोहचवुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत,शिक्षक संघटनेत न्याय व हक्कांसाठी सतत लढणारे लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेले प्रा. जितेंद्र जुनगरे यांची आता घाटंजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेल तालुकाध्यक्षपदी निवड पक्ष मजबुती करीता निवड करण्यात आली.या निवडीबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.विजय कडू, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, अरविंद चौधरी,घाटंजी शहर यूवक कॉग्रेस अध्यक्ष सुनील हुड यांनी जितेंद्र जुनगरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
या निवडीचे श्रेय ते राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष(आदिवासी विभाग) माजी सामाजिक न्यायमंत्री मा.अँड शिवाजीराव मोघे साहेब,
युवानेते जितेंद्र मोघे आणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी ,कार्यकर्ते व त्यांच्या मित्र परिवार यांना दीले.