पारनेर-नगर मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या निवडी जाहीर .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांना पाठबळ देण्यासाठी व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पारनेर-नगर मतदारसंघामध्ये भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली असून पारनेर तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत .
या नियुक्त्या द्वारे पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांना विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागण्याचे स्पष्टपणे संकेत दिले आहेत, तसे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक सामना मधून प्रसिद्ध झाले आहे.
पारनेर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी जाहीर करण्यात आल्या असल्याचे माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे या निवडी कळविल्या आहेत.
उपजिल्हा युवा अधिकारी प्रकाश रोहकले, तालुका युवा अधिकारी अनिल शेटे, उप तालुका युवा अधिकारी दत्तात्रय टोणगे, नागेश नरसाळे, सुयोग टेकुडे, मोहन पवार तर पारनेर शहर युवा अधिकारी मनोज व्यवहारे यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. या सर्वांचे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, पारनेर तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, शिवसेना नेते डॉ.भास्कर शिरोळे, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, महिला तालुकाप्रमुख प्रियंकाताई खिलारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.