ब्रेकिंग न्यूज

एकाच कुटूंबातील पाच सदस्यांचे सांगाडे सापडल्याने खळबळ

Spread the love
२०१९ मध्ये शेवटचे आले होते पाहण्यात 

बंगळुरू  / नवप्रहार मीडिया 

                       कर्नाटक राज्यात उघडकीस आलेल्या  एका घटनेने खळबळ माजली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच लोकांचे सांगाडे सापडले आहेत.  फॉरेन्सिक तपासानंतर मृतांची ओळख पटू शकेल असं पोलिसांनी सांगितलं. कुटुंबातील सदस्य फारच अलिप्त राहायचे. त्यांना गंभीर आजार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुटुंबातील सदस्य २०१९ मध्ये शेवटचे दिसले होते. तेव्हापासून त्यांचं घर बंद होतं.
घरात ५ मानवी सांगाडे सापडल्याची माहिती
पोलिसांनी दिली. हे सांगाडे जगन्नाथ रेड्डी
(८५), त्यांची पत्नी प्रेमा (८०), मुलगी त्रिवेणी (६२), मुलगा कृष्णा (६०) आणि नरेंद्र (५७) यांचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांना एका स्थानिक माध्यम कर्मचाऱ्याकडून घटनेची माहिती मिळाली. परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं माध्यम कर्मचाऱ्याला याबद्दलची माहिती दिली होती. पोलिसांनी मृत कुटुंबाच्या नातेवाईकांशी, परिचितांशी संवाद साधला. मृत कुटुंब अगदी एकांतात जगत होतं. त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या होत्या, अशी माहिती पोलिसांना
चौकशीतून मिळाली. २०१९ च्या जून- जुलैमध्ये हे कुटुंब अखेरचं दिसलं होतं. घर कायम बंद असायचं. दोन महिन्यांपूर्वी सकाळच्या सुमारास कोणीतरी घराचं मुख्य दार तुटलेलं पाहिलं. पण त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली नाही.
घरात कोणीतरी अनेकदा शिरलं आणि तोडफोड केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. घरातील एका खोलीत चार सापळे आढळून आले. पैकी दोन बिछान्यावर झोपलेल्या अवस्थेत, तर अन्य दोन जमिनीवर होते. तर एक सांगाडा दुसऱ्या खोलीत सापडला.
दावणगेरेहून क्रिमिनॉलॉजी लॅबच्या तज्ज्ञांना पुरावे गोळा करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. घटनास्थळ सील करण्यात आलं. कुटुंबाच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. हा प्रकार सामूहिक  आत्महत्येचा असावा. पण अन्य शक्यतादेखील नाकारता येत नाहीत, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. पोलिसांचा तपास प्राथमिक स्थितीत आहे. फॉरेन्सिक तपास आणि मृतदेहांच्या निरीक्षणांनंतर मृत्यूमागचं कारण समजू शकेल, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close