रमजान महिन्यात अक्ख गाव ठेवतो रोजा
या कारनामुळे ठेवतात मुलाचे नाव फकीर बाबा
नांदेड़ / नवप्रहार न्यूज नेटवर्क
भारताला सर्वधर्म समभावाचा देश म्हटल्या जाते. कारण येथे सर्वच धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात.अनेक हिंदू लोक रोजा ठेवतात तर मुस्लिम बांधव देखील हिंदूंचे उपवास करतात. पण नांदेड जिल्ह्यात असे एक गाव आहे जेथे गावातील सगळेच लोक रमजान महिन्यात रोजा ठेवतात. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे.महत्वाचे असे की लोकं आपल्या मुलाचे नाव फकीर बाबांच्या नावावर ठेवतात.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरड गावात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या फकीर बाबाचा बाराशे वर्षापूर्वीचा दर्गा आहे. फकीरबाबा नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथे नवस केल्याने मुलं बाळ होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
फकीर बाबांवर लोकांची श्रद्धा
फकीर बाबाच्या नवसाने मुलं झाल्यास त्याच नाव देखील फकीर बाबा ठेवले जाते. नंतर बारसे करताना नाव बदलतात. याच फकीर बाबांवरील श्रद्धा म्हणून रमजानमध्ये हिंदू महिला रोजाचा उपवास धरतात. कोणी तीन, कोणी पाच तर अनेक महिला महिनाभर उपवास धरतात. शेकडो वर्षे जुनी असलेली ही प्रथा अजूनही या गावात जपली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
शिरडमध्ये हिंदू समाजाच्या काही महिला रमझानमध्ये रोजे धरतात. सकाळी मुस्लीम समाजाप्रमाणे सर्व विधी करून कामाला जातात. होळी, दिवाळी, सप्ताह सर्व धर्मीय एकत्र येऊन साजरे करतात.
शिरडमध्ये सुमारे ५० महिलांचे रोजे
रंजना सुनील चवरे म्हणाल्या, मी दहा वर्षांपासून रोजा पकडते. सकाळी पाचपूर्व स्वयंपाक, जेवण करून शेतात जाते. शेतात दिवसभर काम करून संध्याकाळी पुन्हा घरी स्वयंपाक करते. संध्याकाळी रोजा सोडते. शिरडमध्ये ४० ते ५० महिला असे रोजे धरतात.
गंगाबाई गाडे म्हणाल्या, गेल्या वीस वर्षांपासून मी रोजा धरते. गावकरी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. विशेष म्हणजे फकीरबाबा यांना मानणारे लोकं या गावात आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील प्रेमामुळे गावात एकोपा आहे.