सामाजिक

स्मार्ट फोन मध्ये का असतो एअरलाईन मोड ; तुम्हाला माहिती आहे काय ?

Spread the love

 स्मार्टफोन ही आज आजच्या काळात प्रत्येकासाठी आवश्यक वस्तू बनला आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासोबतच अनेक महत्त्वाची कामे या स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जाऊ शकतात.

स्मार्टफोनचा वापर कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, डॉक्युमेंट शेअरिंग, ऑनलाइन पेमेंट आणि मनोरंजन अशा अनेक कामांसाठी होतो. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक असे फीचर्स असतात जे अनेकांना कधीही वापरलेले नाहीत. अशाच एका फीचरविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण एखाद्या महत्वाच्या व्यस्त असाल किंवा मिटिंगमध्ये असाल तेव्हा इतरांना डिस्टर्ब होऊ नये साठी फोन सायलेंट मोडवर ठेवतो. फोन सायलेंट मोडवर असेल तेव्हा व्हायब्रेशन ऑन असते. अशा वेळी तुम्हाला कोणी कॉल केला तर फोनमध्ये कंपन होते आणि आपल्याला कोणीतरी कॉल करत असल्याचे समजते. परंतु स्मार्टफोनमध्ये असलेल्या एअरप्लेन मोडचा काय उपयोग असतो हे अनेकांना माहिती नसते. याच फीचरची माहिती आज आम्ही सांगत आहोत.

एअरप्लेन मोडचा काय उपयोग काय?

तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही त्यात एअरप्लेन मोड पाहिला असेल. पण त्याचा वापर कधी, कुठे आणि कसा करावा याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. स्मार्टफोनमध्ये दिलेला एअरप्लेन मोड हे खूपच खास फीचर आहे. एअरप्लेन मोड सक्रिय केल्यानंतर तुमच्या फोनवरून नेटवर्क निघून जाते आणि तुम्ही कॉल करू शकत नाही आणि कॉल रिसिव्हही करू शकत नाही. मात्र असे असेल तर हे फीचर का दिले जाते असा प्रश्न अनेकांना पडतो.

एअरप्लेन मोडचा वापर विमान होतो

हे लक्षात घ्या की नावाप्रमाणेच या फीचरचा उपयोग विमानामध्ये केला जातो. तुम्ही फ्लाइटमध्ये चढताच फोन एअरप्लेन मोड म्हणजेच फ्लाइट मोडवर ठेवा अशी घोषणा केली जाते. उड्डाणादरम्यान वैमानिकाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही सूचना केली जाते. विमानात मोबाईल कनेक्शन चालू राहिले तर त्याचा पायलटच्या संवादावर परिणाम होतो आणि समस्या निर्माण होतात. त्यामुळे सर्वांना विमानात मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवण्यास सांगितले जाते.

नेटवर्क कनेक्शनमध्ये समस्या येते

उड्डाणादरम्यान पायलट नेहमीच रडार आणि नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतो. अशा परिस्थितीत जर फोन चालू नसेल म्हणजे एअरप्लेन मोड अॅक्टिव्हेट नसेल, तर पायलटला स्पष्ट सूचना मिळण्यात अचडण येऊ शकते आणि कनेक्शनमध्ये समस्या येते. त्यामुळे विमानात प्रवास करताना फोन नेहमीच एअरप्लेन मोडवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

एअरप्लेन मोडचे इतर फायदे

एअरप्लेन मोडचे इतर अनेक उपयोग आहेत. तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल तर प्रथम एअरप्लेन मोड अॅक्टिव्हेट करा आणि नंतर तो पुन्हा डिअॅक्टिव्हेट करा. यामुळे नेटवर्कची समस्या दूर होते. याशिवाय फोन रीसेट करण्यासाठी देखील एअरप्लेन मोडचा वापर केला जातो.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close