व्यापारी संमेलन व स्नेहमिलन कार्यक्रमाला व्यापा-यांनीच दाखवली पाठ
वरूड मोर्शी मतदार संघात भाजपा ला आत्मचिंतन करण्याची गरज.
वरूड/तूषार अकर्ते
दि.२७ जुन रोज मंगळवारला वरूड शहरातील इंदिरा चौक परिसरातील विष्णू मंगल कार्यालय येथे भाजपा तर्फे मोर्शी-वरूड विधानसभा व्यापारी संमेलन व स्नेहमिलन सोहळ्याला शहरासह संपूर्ण तालूक्यातील व्यापाऱ्यांनी व भाजपाच्या कार्यकरत्यानीच पाठ फिरवली असल्याचे चित्र या कार्यक्रमा दरम्यान दिसुन आले आहे.वरुड मोर्शी तालुक्यातील व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता भाजपा च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र सदर कार्यक्रमस्थळी रात्री ९ वाजेपर्यंत मोर्शी व वरुड तालुक्यातील अत्यल्प व्यापारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मोदी सरकारच्या यशस्वी ९ व्या वर्षाच्या कार्यकाळाच्या निमित्ताने व्यापारी संमेलन व स्नेहमिलन कार्यक्रम संपुर्ण देशभर संपन्न होत आहे. या अनुषंगाने वर्धा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या संकल्पनेतून वरूड शहरातील विष्णू मंगल कार्यालयात मंगळवारला व्यापारी संमेलन व स्नेहमिलन कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित होणा-या व्यापा-यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. परंतु या भागात पाऊस नसताना देखील व्यापा-यांनी या कार्यक्रमाला पाठ दाखवली आहे. त्यामुळे भाजपा ला आत्मचिंतन करण्याची वेळ सध्या मतदार संघात दिसुन येत आहे. या वेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस,डॉ.अविनाश चौधरी,सुनील ढोले, ज्योती मालवीय, उमेश यावलकर, संजय खासबागे यांच्या सह आदि उपस्थित होते.