सामाजिक

आज अर्जुनी मोरगाव येथे गोंदिया भंडारा क्षेत्राचे खा.सुनील मेंढे यांचा जनता दरबार

Spread the love

192 दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग साहित्यांच्या वाटप

भंडारा / राजू आगलावे 

 दिंव्यांग शिबिराचे आयोजन अर्जुनी मोरगाव येथे आज  (सोमवार) होणार आहे. केंद्र सरकारच्या अपंग कल्याण मंत्रालयातर्फे याआधी दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यामध्ये दिव्यांगांच्या गरजेप्रमाणे आजाराचे मोजमाप करण्यात आले होते.यामध्ये 192 लाभार्थी साहित्यासाठी पात्र झाले.या लाभार्थ्यांना स्थानिक प्रसन्न सभागृहामध्ये खासदार मेंढे यांच्या हस्ते दिव्यांग साहित्याचे वाटप सकाळी 11 वाजता होणार आहे.आरोग्य विभागाने सदर माहिती लाभार्थ्यांना दिली आहे. साहित्य वाटप शिबीरा नंतर स्थानिक वात्सल्य सभागृहात एक वाजता खासदारांचे अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन होणार आहे.जनता दरबारात प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, किसान सन्मान योजना,उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मुद्रा लोन आणि जननी सुरक्षा योजना या मुद्द्यांचा आढावा जनता दरबारात घेण्यात येईल. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित होऊन आपल्या समस्या लिखित स्वरूपात सादर करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close