विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

पडलेल्या दुचाकीस्वाराला उचलायला जाणाऱ्याना टिप्परने चिरडले
तीन ठार तर दोन गंभीर जखमी
दुचाकीवरून पडलेल्याला वाचवायला धावले पण स्वतःच अपघाताला बळी पडले
वर्धा / आशिष इझनकर
वर्धा जिल्ह्यातील- वडनेर नजीकच्या मानकापूर चौरस्त्यावर गंभीर अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या नादुरुस्त टिप्परला धडकलेल्या दुचाकीवरील एकाला उचलण्यासाठी पोहचलेल्या कार चालक व बाईक स्वाराला मागावून वेगात येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
जवळ वडनेर पासून अडीच किमी अंतरावर हा अपघात घडलाय. वडनेर शिरसगाव रोडवर सुरकार यांचे शेताजवळ एक टिप्पर सकाळपासुनच उभा होता.या उभ्या टिप्परला एक मोटर सायकलस्वार येउन धडकला.या खाली पडलेल्या मोटरसायकलस्वाराला उचलण्यासाठी तेथुन एका मोटरसायकल वरुन जाणार्या व्यक्तीने व कारचालकाने कार थांबवत मोटरसायकल स्वाराला उचलण्यासाठी धावले. तितक्यात वडनेर कडून येरणगाव कडे भरधाव जाणाऱ्या एका दुसऱ्या टिप्परने वेग अनियंत्रित झाल्याने उभ्या टिप्परला व तेथे मदतीसाठी उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडले.यात तीन जण जागीच ठार झाले असून दोघांना उपचारास रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.वडनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.