क्राइम

ती भाऊजीच्या गाडीवर दिसली हीच बाब तरुणाला खटकली 

Spread the love

तरुणांकडून तरुणीवर गोळीबार 

मोतीहारी ( बिहार ) / नवप्रहार डेस्क 

                      तरुणाच्या कथित प्रेमात असलेल्या तरुणीने नाते पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने मित्राच्या मदतीने तिच्यावर गोळीबार केल्याची घटना कुंडवा चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हसनपूर बलुआ येथे ही घडली आहे. मुलीच्या कमरेच्या खाली गोळी लागली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर बलुआ येथील रहिवासी महेंद्र बैठा यांची मुलगी खुशबू कुमारी आपल्या मेव्हण्यासोबत मोटारसायकलवरून गावी चालली होती. दरम्यान, काही मुले तिथे आली आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्याने मुलांनी तिच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात खुशबू जखमी झाली आहे. तिला तातडीने मोतीहारी येथील रेहमानिया मेडिकल सेंटर येथे दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

खुशबूच्या कंबरेच्या खाली गोळी लागली आहे. तिने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक लोकांनी तिला उपचारासाठी मोतीहारी येथे आणलं. काही मुलांनी तिला अडण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती मुलीने दिली आहे. ती आणि तिचा मेव्हणा थांबले नाहीत त्यामुळे मुलांनी गोळीबार केला. मुलीच्या मेव्हण्याने देखील सांगितलं की, ते दोघे जण गावाकडे फिरायला गेले होते. तेव्हा काही मुलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

>गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमधील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्यानं खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मोतीहारीमध्ये घडलेली ही घटना देखील याच प्रकारची आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडमध्येही अशीच एक घटना घडली होती. तिथे एकतर्फी प्रेमातून एका म्युच्युअल फंड व्यवस्थापकाने आपल्या विवाहित प्रेयसीचा खून केला होता. या प्रकरणातील आरोपी मॅनेजर 44 वर्षांचा होता तर पीडित तरुणी फक्त 22 वर्षांची होती. दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण, तरुणीने घरच्यांच्या दबावामुळे आरोपीशी लग्न करण्यास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून त्याने तिचा खून केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close