विदेश

अहो आश्चर्यम….. !!  मृत चिमुकली 12 तासानंतर पुन्हा झाली जिवंत 

Spread the love

मेक्सिको / नवप्रहार मीडिया 

          काही घटना अश्या घडतात की त्यावर विश्वास करावा किंवा नाही हा मनाला प्रश्न पडतो. पुनर्जन्माच्या काही कथा एकण्यात येतात. पण मृत झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होणे आणि ते ही 12 तासानंतर यावर खरचं विश्वास बसणार नाही. पण असं घडलंय ! आणि हे घडलंय मेक्सिको सिटीत. येथे डॉक्टरांनी मृत घोषीत केलेली चिमुकली 12 तासानंतर पुन्हा जिवंत झाली आहे. चला तर पाहूया खरच अस झालं का ?

मेक्सिकोमधील हे आश्चर्यकारक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ज्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे. मेक्सिकोच्या सॅन लुइस पोटोसी इथं राहणारी 3 वर्षांची कॅमेलिया रोक्साना हिला पोटात संसर्ग झाला. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी उपचारानंतरतिला मृत घोषित केलं. मृत घोषित केल्यानंतर 12 तासांनंतर एक चमत्कार घडला आणि मुलगी जिवंत झाली.

जेव्हा कॅमेलियावर अंत्यसंस्कार केले जात होते, तेव्हा तिच्या आईला वाटलं की तिची मुलगी जिवंत झाली आहे. म्हणून तिनं शवपेटी उघडायला सांगितली, मात्र तिथं उपस्थित लोकांनी गैरसमज असल्याचं सांगत शवपेटी उघडली नाही. मात्र काही वेळाने मुलगी रडायला लागली. त्यानंतर लगेचच तिला शवपेटीतून बाहेर काढण्यात आलं.

आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य झालं. याला कारणीभूत होती ती डॉक्टरांची एक चूक. मुलीला पोटात संसर्ग झाल्यानंतर तिला सॅलिनास डी हिल्डाल्गो कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपचारादरम्यान तिच्या हृदयाचे ठोके बंद झालं. अनेक प्रयत्न करूनही मुलगी उठली नाही, त्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोटात संसर्ग झाल्यानंतर ताप आल्याने त्याचा मृत्यू होईल, असं डॉक्टर सांगत होते. मात्र या मुलीची आई मानायला तयार नव्हती. ती पुन्हा पुन्हा सांगत होती की तिची मुलगी जिवंत आहे.

सऱ्या दिवशी अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असताना कॅमेलियाच्या आईनं तिच्या मुलीच्या शवपेटीत हाचलात होत असल्याचं सांगितलं. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अखेर मुलगी आतून रडायला लागली आणि आईला हाक मारू लागली. त्यानंतर शवपेटी उघडली आणि आत मुलगी जिवंत आढळली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close