अंजनगाव च्या क्रिएटीव्ह इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे तीन विध्यार्थी अव्वल स्तानावर
अंजनगाव च्या तीन विद्यार्थ्यांची 5 लाखाच्या सीमेन्स स्कॉलरशिप प्रोग्रामसाठी निवड
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी शहरातील सुप्रसिद्ध व नामांकित असलेल्या क्रिएटीव्ह इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या तीन विद्यार्थ्यांनची नुकतीच ५ लाखाच्या सीमेन्स स्कॉलरशिप साठी निवड झाली असून सदरची निवड हीं अंजनगाव शहरासाठी भुषणाची बाब असून अशी स्कॉलरशिप मिळणे हीं प्रथमच बाब आहे
ह्यामध्ये कु.गायत्री डाबरे,कु.मनस्वी पाटील व सक्षम वाठ यांची शासकीय अभियांत्रिकीसाठी दिल्या जाणाऱ्या पाच लाखाच्या सीमेन्स स्कॉलरशिपसाठी निवड झालेली आहेत,करीता परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या आधीसुध्दा 8 विद्यार्थ्यांची चार लाखाच्या INSPIRE शिष्यवृत्तीसाठी ह्याच संस्थेमधून निवड झाली होती
क्रिएटिव्हचे इन्स्टिटयूटचे आतापर्यंत नीट परीक्षेतून पास झालेले विद्यार्थी MBBS, BDS, BAMS,B.Sc Nursing करिता शासकीय महाविद्यालयात शिकत आहेत. तर मागील वर्षांत कु सृष्टी तळनकर, कु सलोनी पेठे,पवन सेवेवार,नुपूर तवर यांना सुद्धा शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.
जे ई ई परीक्षेमधून यावर्षी समर्थ श्रीवास्तव ला VNIT NAGPUR ला प्रवेश मिळाला आहेत तर रिया गोबाडे हिला COEP PUNE ला नंबर लागला आहे तर कित्येक विद्यार्थ्यांना शासकीय कॉलेजमध्ये,अभियांत्रिकी मध्ये,B.Pharm,Pharm D,B.Sc Agri प्रवेश मिळाला आहे.मागीलवर्षी सुद्धा अमित बाबनेकर चा NIT तर संस्कृती बारबदे हिची IIIT ला निवड झाली होती.
सर्वांचे यशाचे श्रेय विद्यार्थी हे क्रिएटिव्ह टीम तसेच त्यांच्या आईवडिलांना देतात.
क्रिएटिव्ह इन्स्टिटयूट चे संचालक मॅथस् शाह सर,केमिस्ट्रीचे कुलट सर,बायोलॉजी चे जायले सर व फिझिक्स चे बनसोड सर हे आपल्या कसबीने ज्ञानार्जनाचे काम करत असतात
क्रिएटिव्हमध्ये इन्स्टिटयूट मध्ये कमीत कमी फी मध्ये 11 वी,12 वी बोर्ड, सी ई टी, जे ई ई,नीट व इतर प्रवेश परीक्षेची दर्जेदार तयारी करून घेतल्या जाते त्यामुळेच संस्था हीं भरभराटीचे मार्गावर आहे