क्राइम

तरुणाने डाउनलोड केले अँप आणि जीवन झाले बरबाद 

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

           सोशल मिश्यावर मैत्री करून फसवणूक किंवा अत्याचार याप्रकारचे अनेक प्रकरण घडत असतात. असेच एक ॲप डाउनलोड करून तरुणांशी मैत्री करणे त्या तरुणांच्या जीवावर बेतले आहे. सहा तरुणांच्या टोळक्याने त्याचे व्हिडिओ काढलं त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले होते

या तरुणाने ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरून काही तरुणांशी मैत्री केली. त्यांनी संबंधित तरुणाला पिंपरी येथे बोलावून त्याच्यासोबत नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून त्याच्याकडून हजारो रुपये उकळले. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून पोलिसांनी सहा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणाने २४ फेब्रुवारी रोजी रात्री संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी रविवारी (१६ मार्च) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (वय २२), संदीप रोकडे (वय २०), आकाश चौरे (वय २०, चौघे रा. महेशनगर, पिंपरी, मूळ रा. धुळे ), लोपेश राजू पाटील (वय २०, महेशनगर, पिंपरी, मूळ रा. जळगाव), प्रथमेश जाधव (वय १९, महेशनगर, पिंपरी, मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोपेश पाटील आणि प्रथमेश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मवत तरुण बीसीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याने आपल्या मोबाइलवर एक ऑनलाइन ॲप्लिकेशन डाऊनलोड केले. या ॲपच्या माध्यमातून त्याची आरोपी तरुणांशी ओळख झाली. हे आरोपी तरुणही या ॲपचाच वापर करीत होते. ओळख झाल्यानंतर तरुणांनी पीडित तरुणाला पिंपरीतील महेशनगर येथे भेटायला बोलावले.

आरोपी संदीप रोकडेसोबत पीडित तरुणाला खोलीत पाठवले. इतर तरुणांनी खोलीत दोघांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ घेतले. त्यानंतर आरोपी तरुणांनी पीडित तरुणाला संबंधित फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली; तसेच तरुणाला वारंवार ‘ब्लॅकमेल’ केले. त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली.

तरुणाने ३५ हजार ५०० रुपये दिले. मात्र, आरोपींची पैशांची मागणी थांबत नव्हती. बदनामीच्या भीतीने तरुणाने २४ फेब्रुवारी रोजी संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारली. खाली पडल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारने तरुणाला जोरात धडक दिली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close