ब्रेकिंग न्यूज

‘ ए तो सिर्फ ट्रेलर है ‘ ,  वाळू डेपोच्या वादात काही जीवन होऊ शकतात बरबाद 

Spread the love
डेपो चालकांकडून अनेक  लोकांची आर्थिक अडवणूक केल्याची चर्चा 
आम्ही संयम राखून आहोत तो पर्यंत ठीक – पीडित 
धामणगाव रेल्वे / नवप्रहार मीडिया 
                       काल ( दि. 18 ) ला वाळू डेपोत झालेला वाद हा ‘ ए तो सिर्फ ट्रेलर  है ‘  असे म्हटल्या जात आहे. कारण डेपो चालकाने अनेक लोकांची आर्थिक अडवणूक केल्याने भविष्यात हा वाद अधिक वाढण्याची आणि तो विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल झालेल्या वादानंतर अनेकांनी आपल्या व्यथा मांडतांना ‘ आम्ही संयम बाळगून आहोत तो पर्यंत ठीक ‘ असे बोलून त्यांच्या मनात खदखदत असलेला राग व्यक्त केला आहे.
                         काल (दि.18) ला वाळू डेपो चालकाकडून रॉयल्टी असतांना देखील वाळू देण्यास नकार दर्शविण्यात आल्याने रॉयल्टी धारक आणि डेपो चालकात वाद उफाळून आला होता. पण काही ‘ वाळू माफियांच्या मध्यस्थी नंतर हा वाद मिटला खरा पण भविष्यात हा वाद भयानक रुप धारण करू शकतो असे वाळू माफियांत सुरू असलेल्या चर्चेवरून जाणवले.
डेपो चालक भेंडे यांनी अनेक लोकांची आर्थिक अडवणूक केली असल्याची चर्चा –  पोलीस स्टेशन पर्यंत पोहचलेल्या या वादात जेव्हा मध्यस्थी सुरू होती तेव्हा अनेक लोकांनी आप आपल्या व्यथा त्या ठिकांनी मांडल्या . त्यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवरून असे समजले की त्यांच्या पैकी अनेक लोकांचे पैसे गजू भेंडे यांनी अडवून ठेवले आहेत. उपस्थितांपैकी जवळपास संगळ्यांचा आकडा 4 ते 5 लाखापर्यंत असल्याचे त्यांच्या चर्चेवरून समजते.
आम्ही संयम राखून आहोत तो पर्यंत ठीक – आर्थिक अडवणूक झालेल्या लोकांची मनस्थिती फारच ‘घातक ‘ असल्याचे जाणवले. त्यांच्या मते ते संयम राखून आहेत तो पर्यंत ठीक . आमचा संयम सुटला तर मग परिणाम वाईट होऊ शकतात असा ही इशारा दिला आहे. ( क्रमशः )
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close