विद्युत साहित्य चोरणारा चोर लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मोहाडी./ प्रतिनिधी
मोहाडी व भंडारा तालुक्यात विद्युत साहित्य चोरणारा गिरोला(कारधा)येथील भगत करणं खेरवां ल यास मुंढरी(बु)येथील चकोले डी. पी.वरून ग्रिप काढून पळ काढताना पाठलाग करून करडी स्मस्यान भूमीत पकडून करडी पोलिसांच्या स्वाधीन केले.
मोहाडी तालुक्यातील करडी विद्युत विभागाच्या हद्दीत येणाऱ्या खडकी पालोरा बोरगाव कान्हलगाव मुंढरी(बूज) व (खुर्द) करडी. निलज (खुर्द) व (बूज) नवेगाव(बूज) देव्हाडा व भंडारा तालुक्यातील कोका इंजेवाडा सर्पेवांडा मांडवी या गावातील गावा बाहेर असल्या विद्युत डी.पी. मधील ग्रीप चोरी होत होती.
दोन महिन्या आधी अशीच चोरी झाली होती.पण कुणी चोरले याचा शोध लागत नव्हता शेत कऱ्यांचे धान भाजी पाला गुरांचे गवत पाण्या वीणा वाळत होते त्या मुळे विज वितरण कंपनीने नवीन ग्रिप लावून विद्युत पुरवठा पूर्ववत केला.नवीन ग्रीप बसले याची या चोरांनी खात्री केली व दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ९.३० चे सुमारास गिरोला (कारधा) येथे राहणारा भगत करणं खेरवाल ३० हा राज्य मार्ग क्र.३६१ लगत असलेल्या मुंढरी (बूज) येथील चकोले यांच्या सेता लगत असलेल्या डी.पी. मधील ग्रिप काढून बोरीत भरत असताना मुंढरी(बूज)येथील मोनेश नरेश कोल्हे याना दिसला त्याने फोन करून प्रश्यात मस्के यांना बोलावून घेतले यांना बघून चोर करडी क्या दिशेने मोटार सायकल क्र.MH.३६.AC.५९५८ ने पळू लागला तेव्हा कोल्हे व मस्के यांनी याचोराचा पाठलाग सुरू केला.मागे कुणी येत नाही असे बघून चोर करडी येथील स्मश्यान भूमीत लपण्या साठी सिरला व लगेच मस्के व कोल्हे यांची मोटार सायकल येऊन धडकली त्यांनी इतर लोकांच्या साहाय्याने पकडून करडी पोलिसांच्या स्वाधीन केले करडी पोलीस स्टेशन येथे कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करून मोहाडी न्यायालयात हजर केले न्यायालयाने दि. ….पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
करडी परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारी.विद्युत साहित्य.चोरीस गेले व जात आहे तसेच ढीवरवाडा मांडवी जंगलात रात्री वाटमारी होत असून कारधा व करडी पोलीस रात्री गस्त घालत असून त्यात सुद्धा या लोकांचा सहभाग असू शकतो तेव्हा यांची कसून चौकशी करणे गरजेचे आहे.