राजकिय

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? दोन पवारांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया 

               पुणे येथील शरद पवार यांचे मोठे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची चर्चा असून त्यांनतर अजित पवार सरळ दिल्लीला रवाना झाल्याने राज्याच्या राजकारणात काही तरी घडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दिवाळी पूर्वी हा घटनाक्रम घडत असल्याने राज्याच्या राजकारणात दिवाळी पूर्वीच फटाके फुटणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

                  अजित पवार यांनी आपला वेगळा गट करून शिंदे फडणवीस सरकारला समर्थन देत सरकार मध्ये सहभागी झाले होते. त्यांनतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात  खरी राष्ट्रवादी कोणाची या विषयाला घेऊन वाद झाल्याने प्रकरण निवडणूक आयोग आणि कोर्टात दाखल झाले आहे. असं असताना आज अचानक पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी मोठ्या हालचाली घडल्या. त्याआधी आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट घडून आली. त्यानंतर दुपारी प्रतापरावर पवार यांच्या घरी दोन्ही गटाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. या भेटीनंतर आता आणखी पुढे काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण अजित पवार पुण्यातहून थेट दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी सणात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फटाके फुटण्याचे संकते मिळताना दिसत आहेत.

या सर्व घडामोडींना प्रत्यक्षपणे आणि उघडपणे आज सकाळी सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. पण दोन मोठे नेते एकत्र येणार आणि राजकीय चर्चा होणार नाही, असं शक्यच नाही. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज दुपारी पुण्यात बाणेरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांचं बाणेरमध्ये निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अनेकजण आले होते.

अजित पवार दिल्लीला रवाना

विशेष म्हणजे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चांनंतर घडामोडी इथेच थांबलेल्या नाहीत. कारण आणखी महत्त्वाच्या गोष्टी कदाचित दिल्लीत घडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळेच अजित पवार अचानक प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानाहून पुणे विमानतळावर गेले. तिथून ते दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. अजित पवार गटाची दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बैठकीनंतर अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close