सामाजिक

पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत  संवाद व समुपदेशनाची गरज     _ मा.ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे

Spread the love
पुणे, ता.२८: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चार वेगवेगळया आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. महाविद्यालयातील पोलीसांकडून घेतल्या गेलेल्या ‘ गुड टच, बॅड टच ‘ या सत्रातून ही घटना उघडकीस आली.यातील दोन आरोपी सज्ञान असून दोन अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
          *मा. ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी त्यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेशजी कुमार यांना निवेदन देऊन तशा सूचना केल्या आहेत.*  यात त्यांनी शाळा,महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी त्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे.कॉलेज अंतर्गत विशाखा समिति सेल, मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून त्याचे प्रसारण, विक्री होत असेल तर त्याची सखोल चौकशी, आरोपींवर कडक कारवाई होण्यासाठी, आरोपींवर कडक कलमे जामीनास कसून विरोध करण्याची मागणी तसेच लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची मागणी केली असुन मुलीच्या पुनर्वसनासाठी समुपदेशन, मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. *या घटनेतून मुलींशी संवाद व समुपदेशनातुन मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्नांवर ऊत्तरे  शोधणे व शासनाने याबाबत कठोर भूमिका घेणे असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.तसेच शैक्षाणिक परिसरांत सिसीटिव्ही बसविण्यात दिरंगाई करणाऱ्या व त्यावर देखरेख न करणाऱ्या व्यवस्थापनांवर कडक कारवाई गरजेची*
असेही मत नीलम गोर्हेंनी व्यक्त केले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close