मनिपुर मध्ये घडलेल्या अमानवीय कृत्याचा जाहीर निषेध.
मनिपुर मध्ये घडलेल्या अमानवीय कृत्याचा जाहीर निषेध.
अनेक संघटना एकत्र येत काढला मोर्चा.
वरूड/तूषार अकर्ते
आपल्या देशामध्ये पहाडीभाग, नैसर्गिक सौंदर्य,अनेक खनिजांची भरभराट व बहुसंख्य त्रायबल कमुनिटी असलेले राज्य म्हणजे मणिपूर, या भागातील खनिज संपतीला काही उद्योगपत्यांना विकण्यासाठी तिथल्या वर्तमान सरकारनी त्राईबाल लोकांना आपल्या मालकीची जमिनी पलटवुन देण्यासाठी दडपन आणले तेव्हा तिथल्या त्रायबाल समुदायांनी त्या विषायाला विरोध केला असता तिथल्या स्थानिक सरकारनी कुकी कुमुनिटीचे लोक आणि मेहाताई समाजाचे लोक या कामुनिटीच्या लोकांमध्ये दंगा घडून आणला, असंख्य महिलांचा
सामूहिक बलत्कार करण्यात आला, असंख्य लोकांना जिवे मारण्यात आले, ही घटना ४ मे २०२३ ला घडली असताना ती घटना दाबून ठेवण्याचा प्रयत्न तेथील सरकार कडुन करण्यात आला. परंतु ३ जुलै २०२३ ला संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला हादरून टाकणा-या या घटनेचा व्हिडिओ मणिपूर मधून सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्या देशाला मातेचा दर्जा दिला गेला, नद्यांचे नाव सुद्धा महिलांच्या नावावरून ठेवण्यात आले,ज्या देशात महिलांनी जागदिक पातळीवर क्रांती घडवून आणली, ज्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे,परराष्ट्रीय मंत्री एक महिला आहे. कितीतरी महिलांनी आपल्या देशाची शान जगामध्ये वाढवली आहे, असे असताना आज त्याच देशात त्याच महिलांचा बलात्कार करून मारल्या जाते. त्या महिलांनी आपल्या जमिनी पलटवुन देण्यास नकार दिल्यानंतर तेथील महिलांना नग्न करून भर रस्त्याने मिरवणूक काढण्यात आल्या, देशाचा कारगिल योद्धा रिटायर्ड सुभेदार म्हणतो की मी देशाची इज्जत वाचवण्यासाठी लढू शकलो परंतु माझा पत्नीची इज्जत वाचू शकलो नाही हे आमचा देशाचं दुर्दैव आहे. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय बोद्ध महसभा राष्ट्रीय अध्यक्ष आयु. राजरत्न आंबेडकर व महाराष्ट्राचे अध्यक्ष आयु. हनुमंते यांच्या नेत्रुवात अमरावती जिल्हा पदाधिकारी, वरूड-मोर्शी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱी, बिरसा क्रांती दल, गोंडवाना गणतंत्र पार्टी, अनेक राजकीय व सामजिक संघटनेच्या वतीने मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे व जे जे लोक या घटनेमध्ये गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.याकरिता निषेध मोर्चा शहरातून काढुन तहसिल कार्यालयात धडकला व तहसीलदार रविंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.